Uddhav : ठाकरेंचा नारायण राणेंवर जोरदार हल्ला, ''तुमच्या साईजप्रमाणे एकतरी प्रकल्प कोकणात आणलात का?''

मुंबई तक

ADVERTISEMENT

 udhhav thackeray criticize narayan rane and bjp ratnagiri lok sabha election 2024 vinayak raut
हिंदुहृदयसम्राटांची घराणेशाही नको आहे. गद्दारांची गुडांची घराणेशाही चालते
social share
google news

Udhhav Thackeray criticize Narayan Rane : ''सगळी मंत्रीपद घेतली आमदारकी, खासदारकी, पण माझ्या कोकणासाठी काय केलं, तुमच्या साईज प्रमाणे सूक्ष्म किंवा लघु प्रकल्प कोकणात आणलात का? असा सवाल करत शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) जोरदार हल्ला चढवला. ''तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे. हिंदुहृदयसम्राटांची घराणेशाही नको आहे. गद्दारांची गुडांची घराणेशाही चालते हे दु:ख, हे आम्हाला नसलं, तुम्हाला नसलं तर अटलजींनी वाटलं असेल, अशा शब्दात त्यांनी भाजपवरही तोफ डागली. (udhhav thackeray criticize narayan rane and bjp ratnagiri lok sabha election 2024 vinayaka raut) 

ADVERTISEMENT

रत्नागिरी लोकसभा मतदार संघात विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली.या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काल कोणत्या पक्षात, आज कोणत्या पक्षात आहे, हे आठवत नाही. इतके वर्ष स्वत:सकट स्वत:ची पिळावलं, जिकडे सत्ता असते तिकडे तुम्ही झुकलात, सगळी मंत्रीपद घेतली आमदारकी खासदारकी, पण माझ्या कोकणासाठी काय केलं? तुमच्या साईज प्रमाणे एक लघु किंवा सुक्ष्म  प्रकल्प कोकणात आणलात का? भाजप हुशार आहे त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं, आता निवडणूकीनंतर मायक्रो स्कोप आणाले लागेल, अतिसुक्ष्म, कोरोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार. एवढे सुक्ष्म होतील, अशा शब्दात ठाकरेंनी राणेंची खिल्ली उडवली. 

हे ही वाचा : माढ्यात मविआला झटका, फडणवीसांनी टाकला मोठा डाव

ठाकरे पुढे म्हणाले, मोदी म्हणतात आमची घराणेशाही चालत नाही, बाळासाहेबांचा फोटो लावता, नालायक माणसं अंगामध्ये कर्तृत्व नाही, शिवसेना चोरताय, धनुष्यबाण चोरतात, माझे वडील चोरताय, कर्तृत्व शून्य माणसं आहेत. ''तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे. हिंदुहृदयसम्राटांची घराणेशाही नको आहे. गद्दारांची गुडांची घराणेशाही चालते हे दु:ख, हे आम्हाला नसलं, तुम्हाला नसलं तर अटलजींनी वाटलं असेल, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. 

हे वाचलं का?

''सध्या आयपीएलचे दिवस सूरू आहेत. मॅच बघताना, पंचायत होते की, हा खेळाडू आपल्याकडे होता, तर नाही तो तिकडे गेला.अरे तो तिकडे होता. नाही तो आता तिकडे गेला. तसं आता भारताच्या राजकारणात झाला. आयपीएलमध्ये इनडीयन पॉलिटीकल लीग असंच झालं आहे. मोदी काहीही बोलतील, पण त्यांना आधी 2019 आणि 2014 चा आत्मविश्वास दिसत नाही. आपण फसलो होतोच. मोदींचा आधी काय रूबाब होता? कारण शिवसेना सोबत होती. त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सबपे भारी आणि आजूबाजूला सब भ्रष्टाचारी'', अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हे ही वाचा : भाजपने का दिलं तिकीट? अखेर उज्ज्वल निकमांनीच दिलं उत्तर

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT