अजितदादांचे पदाधिकारी ऐटीत फिरणार, 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ दिल्या गिफ्ट
आगामी काळातील निवडणुकांसाठी अजित पवार गटाने आता कंबर कसली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आता बोलेरो आणि स्कॉर्पिओ कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता या निर्णयाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
NCP Leader: विधानसभेच्या तीन राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. देशासह राज्यातील राजकीय पक्ष आता आगामी काळातील निवडणुकांसाठी शड्डू ठोकून उभा आहेत. त्यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) झालेल्या पक्षांतराच्या मुद्यावरून राजकारण तापले असतानाच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) पक्षाच्या नेत्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी सोन्याचे दिवस आणले आहेत. आगामी काळातील निवडणुकांसाठी अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) आता पदाधिकाऱ्यांना वाहन वाटप करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी बोलेरो आणि स्कॉर्पिओ गाड्या टेस्टिंगसाठी मागवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.
न्यू इअरला गिफ्ट
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता अजित पवार गट आता आणखीन सक्रिय झाला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी तब्बल 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ देण्याचं नियोजन अजित पवार गटाकडून करण्यात आले आहे. त्यातच आज पक्षाकडून 2 गाड्याही टेस्टिंगसाठी मागणवण्यात आल्या होत्या. अजित पवार गटाच्या या निर्णयामुळे पदाधिकाऱ्यांना न्यू इअरला खास गिफ्ट मिळणार असल्याने या निर्णयाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
हे ही वाचा >> नाना पाटेकर निवडणूक लढविणार का? शरद पवारांच्या विधानाने…
पदाधिकाऱ्यांसाठी कोट्यवधींची वाहनं
अजित पवार गटाकडून ज्या गाड्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ असल्याचेही सांगण्यात आले आहे. बोलेरोची किंमत 16 लाख रुपये असून 40 गाड्यांची एकूण किंमत 6 कोटी 40 लाख रूपये होणार आहे. तर स्कॉर्पिओची किंमत 22 लाख असून 40 गाड्यांची किंमत 8 कोटी 80 लाख रुपये होणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
निवडणुकीसाठी जय्यत तयारी
अजित पवार गटाने घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना आता सोन्याचे दिवस येणार असून आगामी काळात आणखी जोरदारपणे कामाला लागणा असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी केली असून या निर्णयाचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
हे ही वाचा >> पुणे हादरलं! कॉलेजजवळच 10 सिलिंडर फुटले, नेमकं प्रकरण घडलं कसं?
ADVERTISEMENT