Ajit Pawar : ‘वन नेशन, वन इलेक्शन देशासाठी महत्वाचे’ अजितदादांकडून मोदींचा उदोउदो..
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती बैठकीत वन नेशन वन इलेक्शनचे समर्थन करताना त्यांनी भविष्यातील निवडणुकाही महायुतीच्या अंतर्गतच लढल्या जातील.
ADVERTISEMENT
Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार स्थापन झाल्यामुळे देश प्रगतीपथावर आहे. त्यांच्यामुळेच देशात वन टॅक्स (one tax) सुरु झाल्याने त्याचा फायदा लोकांना झाला. वन टॅक्स सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यालाही विरोध झाला होता. त्यामुळे आता वन नेशन, वन इलेक्शनलाही विरोध होतो आहे. मात्र देशाच्या प्रगतीसाठी वन नेशन, वन इलेक्शन (one nation one election) गरजेचे असून देशासाठी हे महत्वाचं असल्याचे मत महायुतीच्या बैठकीवेळी पत्रकारांबरोबर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (one nation, one election important for the country ajit pawar supports narendra Modi)
ADVERTISEMENT
वन टॅक्स प्रमाणेच वन नेशन
अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, देशात वेगवेगळे टॅक्स लावण्यात आले होते. त्यामुळे एखादी गोष्ट घेताना राज्य राज्यामध्ये त्याच्या किंमती वेगवेगळ्या होत्या. त्यामुळेच नोदी सरकारने जीएसटीचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. वेगवेगळे टॅक्स होते त्यामुळे जीएसटी निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा>>INDIA Meeting : ‘इंडिया’च्या बैठकीत रंगाचा बेरंग का झाला?, कपिल सिब्बलांच्या एन्ट्रीनंतर काय घडलं?
निवडणुकांमुळे अनेक प्रश्न
‘वन नेशन वन इलेक्शन’, हे सगळ्यात चांगले विधेयक आहे. कारण लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचंड खर्च येतो. वेगवेगळ्या निवडणुका होत असल्यामुळे ज्या प्रमाणे खर्चाच विषय असतो त्याच प्रमाणे अधिकाऱ्यांचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मोदी सरकारचा निर्णय देशासाठी चांगलाच असणार आहे. अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्यानंतर ही पहिलीच बैठक झाली आहे. या बैठकीत भविष्यात होणाऱ्या निवडणुका आम्ही एकत्रच लढवणार असल्याचा निर्णयही या महायुतीच्या बैठकीत झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे वाचलं का?
या निर्णयाने देश प्रगतीपथावर
एक देश एक निवडणूक हा निर्णय देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणार आहे. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची वाटत असल्यामुळेच त्याबाबतचे मी ट्विट केले असल्याचेही त्यांनी सांगितले. याची देशाला नितांत गरज असून एकत्र निवडणूक झाल्या तर खर्च कमी होतो. निवडणुकांच्या प्रक्रियेमुळे प्रशासकीय मान्यता देता येत नाही, त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीनेही त्या अडचणीच्या ठरतात. त्यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या योजना पोहचवण्यासाठी ‘वन नेशन वन इलेक्शन’ महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा>> INDIA Alliance : वाद टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरला; वाचा मुंबई बैठकीची Inside Story
विरोधकांना नेतृत्व नाही
अजित पवार यांनी विरोधकांच्या इंडियाच्या बैठकीवर बोलताना त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. देशातील 28 पक्ष एकत्र येऊन जर विरोधक आपले नेतृत्व ठरवू शकत नसतील तर भविष्यातील निर्णय घेणेही त्यांनी अवघड जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
मोदी पुण्यातून निवडणूक लढविणार..?
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामधून लढणार असल्याच्या वृत्तावर बोलताना अजितदादांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे गुजरातमधूनच लढणार आहे. मात्र ते जिथून निवडणूक लढविणार असले तरी महायुतीच्या माध्यमातून तीनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT