राज ठाकरे आणि गौतम अदानींचा 'तो' फोटो... ठाण्यातून राज ठाकरेंचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर
राज ठाकरे आणि अदानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून भाजप नेते राज ठाकरेंवर टीका करत आहे. ज्याला राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी मुंबईतील सभेत उद्योगपती गौतम अदानी यांचं मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील गेल्या 10 वर्षात पसरत जाणारं साम्राज्य दाखवत त्यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भजाप नेत्यांकडून कालपासून एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. तो म्हणजे गौतम अदानी यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट. यावरून भाजपने राज ठाकरेंवर टीका सुरू केली. ज्याला आज (12 जानेवारी) राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे.
'माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेलाय एकदा.. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, मुकेश अंबानीही येऊन गेलेत.. माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती, सिने कलाकार येऊन गेलेत.. घरी येऊन गेले म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?' असा सवाल करत राज ठाकरेंनी गौतम अदानींसह भाजपवर जोरदार टीका केली.
पाहा ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय म्हणाले
'काल मी त्या गौतम अदाणीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या.. काय पुढे सुरु केलं तर.. माझा आणि गौतम अदाणींचा एक फोटो.. बरं मग पुढे?'

'माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेलाय एकदा.. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, मुकेश अंबानीही येऊन गेलेत.. माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती, सिने कलाकार येऊन गेलेत.. घरी येऊन गेले म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?'










