लाइव्ह

PM Narendra Modi Live : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी PM पंतप्रधान मोदींकडून जाहीर माफी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : देशातील सर्वाधिक खोलीच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पालघर येथे दुपारी १ वाजता हा समारंभ होईल.

ADVERTISEMENT

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला आहे. येत्या 29 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पुढील महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा पश्चिम महाराष्ट्रात येणार आहे.

मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण राज्यात चांगलंच तापलं आहे. तसेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार हे सलग तीन दिवस कोल्‍हापुरात आहेत. 2 सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होत आहे. वारणा महिला उद्योग समूहाच्या सबलीकरण मेळाव्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 सप्टेंबरला वारणानगर येथे येत आहेत.अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

 

ADVERTISEMENT

  • 03:49 PM • 30 Aug 2024

    Maharashtra News : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी PM पंतप्रधान मोदींकडून जाहीर माफी

    'शिवरायांच्या चरणावर डोकं ठेऊन माफी मागतो. सावकरांना अपमानित करूनही काहीजण माफी मागत नाहीत. मी शिवरायांची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्यदैवत, आमच्यावरील संस्कार वेगळे आहेत.' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात जाहीर माफी मागितली.

    तर, पुढे म्हणाले की, 'वाढवण बंदराकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे मच्छिमारांचे उत्पन्न वाढले. वाढवणमुळे 12 लाख रोजगारची संधी उपलब्ध होईल. वाढवण बंदराला रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडलं जाणार, महायुतीचं सरकार देशाला पुढे नेणार. भारत मत्स्य उत्पादनात जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे. वाढवण बंदर देशातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असेल.

    महाराष्ट्र विकासात आणि महिला सशक्तीकरणात देशाला दिशा दाखवतोय. राज्याच्या मुख्य सचिव पोलीस महासंचालक महिला आहेत. सर्व महिला अधिकारी चांगल्या पद्धतीने कारभार सांभाळत आहेत. नारी शक्ती देशाला नवी दिशा दाखवणार. '

  • 12:04 PM • 30 Aug 2024

    Maharashtra News : वर्षा गायकवाडांना पोलिसानं घेतलं ताब्यात, घराबाहेर मोठा फौजफाटा

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौ-याच्या पार्श्वभूमीवर मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून त्यांना हाऊस अरेस्ट केली आहे.

     

  • 10:23 AM • 30 Aug 2024

    Maharashtra News : चंद्रपुरात एकाच दिवशी 2 चिमुकल्या मुलींचा विनयभंग, आरोपींना अटक

    चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी चिमुकल्या मुलींच्या विनयभंगाच्या २ घटना उघडकीस

    पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना केली अटक

    पहिली घटना नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील असून घराजवळ खेळणाऱ्या एका ८ वर्षीय चिमुकल्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून महादेव गोरडवार (५२) या आरोपीने केला विनयभंग,

    तर दुसऱ्या एका घटनेत चिमूर तालुक्यातील दाबला हेटी गावात मद्यपी तरुणाने ५ वर्षीय मुलीचा केला विनयभंग,

    पीडित मुलगी शाळेत जात असतांना २५ वर्षीय आरोपीने दारूच्या नशेत केला चिमुकल्या मुलीचा विनयभंग

  • 08:59 AM • 30 Aug 2024

    'राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष उद्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

    पुढील महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा पश्चिम महाराष्ट्रात येणार आहे. त्याच्या पूर्व तयारीचा मेळावा शनिवारी (ता. ३१) दुपारी चार वाजता मार्केट यार्डमधील ए. एस. मल्टिपर्पज हॉलमध्ये ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी तटकरे संवाद साधणार आहेत. पक्षाच्या संघटनाचा आढावा घेणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर) आणि कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी दिली.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT