Ram Mandir : PM मोदी प्राणप्रतिष्ठा करत असताना अमित शाह काय करत होते?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: अयोध्यानगरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तब्बल 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर देशातील रामभक्तांना हा ऐतिहासिक सोहळा अनुभवता आला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), सरसंघसंचालक मोहन भागवत आणि राम मंदिर न्यासाचे अनेक अधिकारी आणि बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. मात्र गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते या सोहळ्याला कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे पंतप्रधान मोदी रामलल्ल्लाची प्राणप्रतिष्ठा करत असताना अमित शाह नेमके कुठे होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (pm narendra modi ram mandir inauguration ramlala pran pratishtha where is bjp other minister)

ADVERTISEMENT

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करत असताना अमित शाह, राजनाथ सिंह असे भाजपचे अनेक मंत्री त्याठिकाणी अनुपस्थित होते. याउलट हे मंत्री विविध मंदिरात जाऊन नागरीकांसह रामलल्लाची पुजा करत होते. इतकंच नाही तर या मंत्र्यांनी मंदिरातच नागरीकांसोबत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह पाहिला होता. या संबंधित फोटो आणि व्हिडिओ या नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

हे ही वाचा : Ayodhya Ram Mandir Live: ‘शिवाजी राजांना संन्यास घ्यायचा होता..’, PM मोदींसमोर ‘त्या’ महाराजांचं वक्तव्य

भापजचे ज्येष्ठ नेते आणि पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाच्या मुहूर्तावर दिल्लीच्या झंडेवालान मंदिरात पोहोचले होते. या मंदिरात जेपी नड्डा यांनी त्यांचे कुटुंबिय आणि कार्यकर्त्यांसह रामलल्लाची पूजा केली. आणि याच मंदिरातून नड्डा यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळाही लाईव्ह पाहिला होता. नड्डां पाठोपाठ केंद्रिय गृहमंत्री अमित शाह देखील प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर नवी दिल्लीच्या बिडला मंदिरात पोहोचले होते. या मंदिरात अमित शाह यांनी प्रभू रामाची आरती करून प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला.

हे वाचलं का?

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या मुहूर्तावर दिल्लीच्या दरियांगज परिसरात असलेल्या मंदिरात पोहोचले होते. या मंदिरातच राजनाथ सिंह यांनी कार्यकर्त्यांसह आरती केली. यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह पाहिला होता. ही एका नवीन युगाची सूरूवात आहे. कारण भगवान राम 500 वर्षानतर त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत, असे राजनाथ सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. राजनाथ सिंह यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संबंधित फोटोही शेअर केला आहे.

हे ही वाचा : Ram Mandir Pran Pratishtha: आमंत्रण मिळूनही अडवाणी का गेले नाही अयोध्याला, कारण…

या नेत्यांसह भाजपचे राष्ट्रीय सचिव सरदार मनजिंदर सिंह सिरसा पश्चिम दिल्लीच्या सुभाष नगर परिसरात असलेल्या पीरवाला मंदिरात पोहोचले होते. तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, चांदनी चौकच्या गौरी शंकर मंदिरात पोहोचले होते.तर दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा दिल्लीच्या झंडेवालान मंदिरात पोहोचले होते. या मंदिरात या नेत्यांनी रामलल्लाची आरती केली आणि कार्यकर्त्यांसह हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT