Sahil Khan Arrested : अभिनेत्याला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांनी अभिनेता साहिल खानला अटक केली.
अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी अटक केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेता आणि फिटनेस इन्फ्लुअन्सर साहिल खानला अटक

Sahil Khan Latest News : (देव कोटक, मुंबई) अभिनेता साहिल खानच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाने अभिनेत्याला अटक केली आहे. खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती. अभिनेत्याने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Sahil Khan Arrested By Mumbai Police SIT Team)

ADVERTISEMENT

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. या यादीत अभिनेता साहिल खानच्या नावाचाही समावेश आहे. अभिनेत्याला छत्तीसगडमध्ये अटक करण्यात आली आणि तेथून मुंबईत आणण्यात आले. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.

हेही वाचा >> भाजपने कापलं तिकीट, पूनम महाजन म्हणाल्या...

या अभिनेत्यावर लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. 

हे वाचलं का?

ॲपच्या प्रचारासाठी साहिल खानने आपले वजन वापरले. तो सेलिब्रिटींना बोलावून भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील आणखी अनेक महत्त्वाच्या बाबी पोलीस तपासातून समोर येऊ शकतात.

साहिल खान कोण आहे?

अभिनेता साहिल खान त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्याने काम केलेले आहे. मात्र, साहिलला चित्रपटांमध्ये काही चांगले यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने इंडस्ट्री सोडली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'उद्धव ठाकरे, शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट', भुजबळांचे मोठे विधान 

सिनेक्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्याचा फिटनेस प्रवास सुरू झाला आणि तो फिटनेस इन्फ्लुएंसर बनला. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते. 

ADVERTISEMENT

साहिल म्हणाला की, 'तो टॅलेंटेड आहे, पण त्याच्या टॅलेंटचा चित्रपटांमध्ये योग्य वापर झाला नाही. त्यामुळेच त्याने उद्योजक होण्याचा विचार केला.'

26 वर्ष लहान मुलीशी केले लग्न 

साहिल खान हा अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने दुसऱ्या लग्नाचा खुलासा केला होता. अभिनेत्याने सांगितले होते की, त्याने मिलेनासोबत रशियामध्ये साखरपुडा केल्यानंतर लग्न केले. 

साहिल मिलेनापेक्षा २६ वर्षांनी मोठा आहे. लग्नाबाबत अभिनेत्याने सांगितले होते की, 'मिलेना आल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले आहे. ती त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी ती खूप हुशार आहे. ती सकारात्मक आहे आणि मला आनंदी ठेवते.'

हेही वाचा >> ''रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या...राणे शिवसेनेत असेपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही''; राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

अभिनेत्याने 2004 मध्ये इराणमधील अभिनेत्री निगार खानशी लग्न केले होते. पण लग्नाच्या अवघ्या एक वर्षानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT