Sunil Tatkare : ’70 हजार कोटींचा घोटाळा’, PM मोदींना तटकरेंनी दिला हिशोब

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Sunil Tatkar, Ajit Pawar, PM Modi : भोपाळ येथील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील विरोधी पक्षांच्या घोटाळ्यांचे आकडे सांगितले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) 70 हजार कोटींचा घोटाळा (70 thousand crore scam) केल्याचा आरोप मोदींनी केला. मोदींच्या या आरोपाला उत्तर देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (State President Sunil Tatkare) यांनी जलसिंचनावर झालेल्या खर्चाचा सगळा हिशोबच मांडला. ते कर्जत येथील मेळाव्यात बोलत होते. (Sunil Tatkare clearifiaction on 70 crore thousand irrigation scam allegations)

आरोपाला तटकरेंनीही दिलं उत्तर

2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढला आणि सरकार पडल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी मांडला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असल्याचे  त्यांनी सांगितले होते. त्यालाच जोडून 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाला सुनील तटकरेंनीही उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “70 हजार कोटी, हा शब्दप्रयोग समोर आला. 1952 ते 2012 या कालावधीत सिंचन प्रकल्पावर 70 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

हे ही वाचा >> Assembly Elections 2023 Exit Poll Live Updates: पाच राज्यात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये नेमका कौल कुणाला?

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद

जायकवाडी, उजनी, गोसीखूर्द आणि महाराष्ट्रातील इतर धरणांना 70 हजार कोटी रुपये खर्च झाले. त्यातील 15 हजार कोटी आस्थापने, 17 हजार कोटी भू-संपादन आणि इतर प्रकल्पांवर 30 ते 35 हजार कोटी खर्च झाले”, असा खुलासा सुनील तटकरेंनी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपावर केला. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, “राज्यातील लाखो हेक्टरवरील जमीन ओलीताखाली आली. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न वाढलं. पण, अजित पवारांना लक्ष्य करण्यात आले. कारण अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिली होती”, असे उत्तर तटकरेंनी दिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“न मागताच भाजपला दिला पाठिंबा”

यावेळी सुनील तटकरेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना लक्ष्य केले. “2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच मला आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याबद्दल घोषणा करायला सांगितलं. भाजपने पाठिंबा मागितलेला नसताना राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा जाहीर केला”, असे म्हणत तटकरेंनी शरद पवारांकडे बोट दाखवले.

हे ही वाचा >>‘…म्हणून मामाने तर जुगाड केला’, बावनकुळेंचा नेमका रोख कोणाकडे?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT