भावना गवळींनी थेट महायुतीलाच ठणकावले...,'मैं अपनी झांसी नहीं दूंगी'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण अशी ओळख असलेल्या खासदार भावना गवळी आज मोदी यवतमाळ दौऱ्यावर येत असल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत, मात्र मोदींची बहीण अशी प्रतिमा असली तरी त्यांच्याच महायुतीच्या जाहिरातीतून मात्र खासदार भावना गवळी यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावाची प्रचंड चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'मैं अपनी झांसी नहीं दूंगी' भावना गवळींचं सूचक विधान
माझ्याच नावाच अशी चर्चा का? भावना गवळींचा नेत्यांना सवाल
यवतमाळ/भास्कर मेहरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यवतमाळकरांचं वेगळं नातं असल्याचं सांगत खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) यांनी हा आजचा दिवस यवतमाळकरांसाठी (Yavatmal ) मोठ्या आनंदाचा असल्याचे सांगितले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये येणार त्यामुळे सर्व वर्तमानपत्रातून महायुतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्या जाहिरातातून मात्र सलग पाच वेळा निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांचा फोटो मात्र वगळण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातील लोकसभेच्या (Lok sabha Election 2024) जागेवरून येथील राजकारण आणखी तापले असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
जाहिरातीतून पत्ता कट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे आता स्थानिक नेत्यांनी स्वागताचे फलक लावले असून वृत्तपत्रातूनही मोठ मोठ्या जाहिराती दिल्या आहेत, त्या जाहिरातीतून स्थानिक आमदारांचे फोटो झळकले आहेत, परंतू खासदार भावना गवळी यांना मात्र त्यातून डावलण्यात आले आहे. त्यानंतर भावना गवळींनी त्यांच्याच मागच्या वक्तव्याची पुनरावृत्ती करत आजही त्यांनी पुन्हा एकदा 'मै अपनी झांसी नहीं दूंगी' असं म्हणत सूचक वक्तव्य केले आहे.
राठोड-गवळी वाद चव्हाट्यावर
यवतमाळमध्ये लागलेल्या जाहिराती अनेक गोष्टींमुळे चर्चेत आल्या आहेत. कारण महायुतीनं जसे मोठे फलक लावले आहेत, तसेच फलक खासदार भावना गवळी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे फलक लावले आहेत, मात्र त्यामध्ये शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राठोड-गवळी हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
हे वाचलं का?
मला त्याचं महत्व नाही
नरेंद्र मोदी येणार म्हणून प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आणि फलकांविषयी त्यांनी बोलताना सांगितले की, 'या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो महत्वाचा आहे, आणि तिच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बॅनरवर किंवा जाहिरातीमध्ये माझा फोटो लागला काय किंवा नाही लागला काय मला त्याचं फारसं महत्व नाही' असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरवेळी माझीच चर्चा का?
खासदार भावना गवळींचा फोटो जाहिरातीतून वगळण्यात आल्याने आगामी निवडणुकीविषयी त्यांच्या जागेचं काय होणार अशी चर्चा होऊ लागली आहे. मात्र त्यांनी आपल्या उमेदवारी आपण ठाम असून मी सलग 5 वेळा निवडून आलेली महिला खासदार आहे, त्यामुळे दरवेळी माझ्याच नावाची अशी चर्चा का केली जाते असा सवाल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांना करू शकते असंही त्यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> 'असले चाळे बंद करा', जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा ललकारलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT