Congress: शिंदे, अजित पवार गट चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत.. हा माणूस काय भानगडी… : पृथ्वीराज चव्हाण

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

prithviraj chavan stormy criticism to eknath shinde and ajit pawar he said they come to power to hide there thieves maharashtra politics news today
prithviraj chavan stormy criticism to eknath shinde and ajit pawar he said they come to power to hide there thieves maharashtra politics news today
social share
google news

Prithviraj Chavan Criticized Ajit Pawar and Eknath Shinde: सातारा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट हा चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत गेला आहे.. राज्याच्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. शिंदे शिवसेना गटाचे अस्तित्व हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहे. त्यांनी गद्दारी, फितुरी करून सत्ता मिळवली आहे. पाठीत खंजीर खुपसून दोन्ही गट सत्तेत सहभागी झाले. अशी अत्यंत जहरी टीका काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. (prithviraj chavan stormy criticism to eknath shinde and ajit pawar he said they come to power to hide there thieves maharashtra politics news today)

ADVERTISEMENT

काँग्रेस हा सध्या महाविकास आघाडीत मोठा पक्ष आहे.. सध्याची राजकीय परिस्थिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत गेले पाहिजे. अशा सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या बैठकीत केल्या आहेत. ते साताऱ्यात बोलत होते.

‘हा माणूस काही भानगडी करून पुन्हा सत्तेत आला तर…’

‘मी सगळ्यांना सांगतोय की, ईडी कायदा काही रद्द होणार नाही. तुम्ही जर गुन्हा केला असेल तर चौकशी केली पाहिजे. पहिल्यांदा आपण लोकांकडे गेलं पाहिजे..लोकांना सांगितलं पाहिजे की, परिवर्तन होणार आहे. दुसरी गोष्ट आपली विधानसभेची निवडणूक उशिरा आहे. ऑक्टोबरला आहे.. पण लोकसभा निवडणूक इतकी महत्त्वाची आहे की, ती निवडणूक आली आपण जिंकलो की… विधानसभा काही अर्थ राहत नाही.’

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Mumbai Crime: 17 दिवसांचं बाळ अन्…अंगावर काटा आणणारी कहाणी

‘पण उलटं झालं.. हा माणूस काही भानगडी करून पुन्हा सत्तेत आला तर मला लोकशाही राहील की नाही याची चिंता आहे. त्यामुळे लोकसभा महत्त्वाची.. विधानसभा नंतर आधी सातारा आणि माढा लोकसभा निवडणुकीचा विचार करा.. सरकार आणूया..’

‘सरकार आलं की, बघा इकडे सगळं कसं होतं ते.. जी माणसं पळाली सगळी ही सगळी माणसं कशी दारात उभी राहतात ते बघा.. कारण हे फक्त सत्तेकरता आणि ज्या चोऱ्या केल्या आहेत त्या चोऱ्या दडविण्यासाठी आणि तुरुंगातून बाहेर राहण्याकरिता गेले आहेत.’ असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेटच निशाणा साधला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mumbai Crime : अल्पवयीन मुलगी रिक्षात बसली अन् वासनांध चालकाने…धक्कादायक घटनेने शहर हादरलं

पृथ्वीराज चव्हाण हे आतापर्यंत सातत्याने भाजपवर हल्ला चढवत आले आहेत. भाजपच्या विरोधात रान उठविण्यासाठी ते आता देखील तळागाळात जाऊन काँग्रेसचा प्रसार करत आहेत. अशावेळी आता भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या या टीकेला कसं उत्तर दिलं जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT