गजानन कीर्तिकरांचा पत्ता कट! रामदास कदमांनी जाहीर केलं उमेदवाराचं नाव

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Ramdas kadam claim on mumbai north west lok sabha election : खासदार गजाभाऊ कीर्तीकर (Gajanan kirtikar) ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे आता वय झालंय. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात गजाभाऊ कीर्तिकर उभे राहत नसतील, तर या ठिकाणी सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) उमेदवारी मागतील, असे विधान करून शिंदे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी कीर्तीकरांच्या लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला होता. इतकंच नाही तर त्यांनी आपल्याच मुलाचं नाव जाहीर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती दिली. यावर अद्याप तरी गजानन कीर्तीकर यांची प्रतिक्रिया समोर आली नाही आहे.मात्र लोकसभेच्या जागेवरील दाव्यानंतर रामदास कदम आणि गजानन कीर्तीकर यांच्यात जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (ramdas kadam claim on mumbai north west lok sabha seat election siddhesh kadam gajanan kirtikar)

खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत, तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. तर शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच या मतदार संघात सिद्धेश कदम यांचे बॅनरही झळकले आहेत. त्यामुळे रामदास कदमांच्या विधानाची आता चर्चा रंगलीय.

हे ही वाचा : Crime : भयंकर! भाजप नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करून शरीराचे केले तुकडे तुकडे

रामदास कदम काय म्हणाले?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हेच पुन्हा उभे राहतील, कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल असे सांगत खासदार गजाभाऊ कीर्तीकर यांचे आता वय झाले आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कदाचित गजाभाऊ कीर्तिकर उभे राहिले नाहीत तर या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील असं मोठे वक्तव्य शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली दौऱ्यावर असताना केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गजानन कीर्तीकर हे जर का उभे राहिले नाहीत तर या लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम उमेदवारी मागतील आणि तो आपला हक्क आहे आणि अधिकार आहे, पण गजाभाऊ जर का इकडे उभे राहिले तर सिद्धेश कदम उभे राहणार नाही असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर याच मतदारसंघातून उमेदवार असतील असेही आपण ऐकतो आहे. यामुळे बाप आणि बेटा यांच्यामध्येही या मतदारसंघात सामना होत असेल तर होऊन जाऊ दे असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : Mukesh Ambani : CS चं घेतोय शिक्षण, अंबानींना धमकी देणारा राजवीर कोण?

मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून गेल्यावेळी खासदार म्हणून निवडून आले होते. गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेत अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे. गजानन कीर्तीकर हे बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे होते. बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले आहे. मुंबईतील शिवसेना वाढीसाठी कीर्तीकरांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT