Nitesh Rane : ‘स्टुडिओ विकण्यासाठी ठाकरेंच्या नितीन देसाईंना धमक्या’; राणेंचे गंभीर आरोप
Nitesh Rane on Thackeray Family : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
Nitesh Rane on Thackeray Family : कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्ज झाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यानंतर रविवारी पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊत यांनी सनी देओल यांच्या घराचा होणारा लिलाव थांबला मग एनडी स्टुडिओ का वाचला नाही असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे देत होत्या. त्याच बरोबर मातोश्रीच्या जवळचा माणूसही स्टुडिओ विकण्यासाठी धमक्या देत होता असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर केला आहे. (nitesh rane rashmi and uddhav thackeray threaten sell Nitin Desai nd studio including mp sanjay raut)
ADVERTISEMENT
ठाकरेंसह राऊत आरोपीच्या पिंजऱ्यात
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकेर कुटुंबीयांवर आरोप करताना त्यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येला रश्मी आणि उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी खासदार संजय राऊत यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे.
हे ही वाचा >> Ajit Pawar Press : ‘महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा’; भुजबळांच्या भाषणावर अजितदादा बोलले
मालक आणि मालकाचा मुलगा तुरुंगात
खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. तर त्यांच्याबरोबरच आदित्य ठाकरेही टीका करतात. राऊत यांच्या मालकाचा मुलगा म्हणजेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर कायद्याचा बडगा उचलला जाणार. तसेच 2024 मध्येही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आणि संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे दोघंही अर्थर रोड तुरुंगात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Chandrasekhar Bawankule : ‘जर तुम्ही लिमिट सोडलं तर आम्हीही…’; उद्धव ठाकरेंना भाजपनं सुनावलं….
स्टुडिओ विकण्यासाठी तगादा
नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना गंभीर आरोप केल्याने साऱ्यांचे भुवया उंचवल्या आहेत. एनडी स्टुडिओ आपल्याला विका अशा धमक्या ठाकरे कुटुंबीयांनी दिल्यामुळेच कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. नितेश राणे यांच्या या आरोपामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT