बंड यशस्वी झालं नसतं तर शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते: दीपक केसरकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

rebellion if not successful eknath shinde would have shot himself shocking statement minister deepak kesarkar
rebellion if not successful eknath shinde would have shot himself shocking statement minister deepak kesarkar
social share
google news

Maharashtra Political News: मुंबई: जर शिंदे साहेबांचं बंड यशस्वी झालं नसतं तर ते त्याचवेळी डोक्यात गोळी घालून घेणार होते. असं अत्यंत खळबळ उडवून देणारं विधान शिवसेनेचे (Shiv Sena) कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी वक्तव्य केलं आहे. एका पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. 20 जून हा दिवस गद्दार दिन म्हणून जाहीर करावा असं म्हणत शिवसेना (UBT)नेते हे शिंदे गटाला सातत्याने डिवचत आहेत. याचा मुद्द्यावर बोलताना केसरकर यांनी अतिशय उद्विग्न अशी प्रतिक्रिया यावेळी दिली. (If the rebellion had not been successful, Eknath Shinde would have shot himself in the head. Said Minister Deepak Keasarkar)

‘माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही? त्यावेळी मी एकच गोष्ट केली असती. माझ्या बरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं.. मी एक फोन केला असता.. की, माझी चूक झालेली आहे.. पण या लोकांची काही चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती.’, असं एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.

दीपक केसरकरांचं खळबळ उडवून देणार विधान

‘महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिंदे साहेबांनी बंड केलं होतं. कोणाला गद्दार म्हणता? असा एक मनुष्य.. मी आजपर्यंत बोललो नव्हतो कधी मीडियाच्या समोर.. की, माझ्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत एकनाथ शिंदे साहेबांशी.. ज्या-ज्या वेळेला उद्धव साहेब असं करत होते की, वचन द्यायचे आणि ते तोडायचे.. त्या-त्या प्रत्येक वेळेला मी त्यांना जाऊन सांगितलं आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘पण एक गोष्ट त्यांची अतिशय महत्त्वाची आहे. त्यांनी निश्चितपणे उठाव केला.. आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की, माझ्या बरोबर ही सगळी लोकं प्रेमाने आली आहेत. कारण ज्या दिवशी त्यांचा अपमान झाला.. तो सुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. त्याला अत्यंत अपमानित केलं. त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. ते शेवटी आमचे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान तुम्ही का केला? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे.’

हे ही वाचा >> अनैसर्गिक सेक्सच्या वादातून 55 वर्षीय पुरुषाचा गळाच चिरला, नेमकं घडलं काय?

‘ते समजा.. रागावून निघून गेले असते.. तर त्यांनी परत येण्याची तयारी दाखवलेली होती. एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने आज जाणून घेतली पाहिजे.. की, शिंदे साहेब हा एक सच्चा मनुष्य, शिवसैनिक आहे. त्यांनी काय सांगितलं की, ज्यावेळी मला असं वाटायला लागलं की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही? त्यावेळी मी एकच गोष्ट केली असती. माझ्या बरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं.. मी एक फोन केला असता.. की, माझी चूक झालेली आहे.. पण या लोकांची काही चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती.’

ADVERTISEMENT

‘असं म्हणणारा मनुष्य.. कुठल्या दर्जाच्या असतो.. कशारितीची माणुसकी त्याच्याकडे असते की, माझ्यामुळे एकाही आमदाराचं नुकसान होता कामा नये. प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल.. असं म्हणण्याऱ्या माणसामागे लोकं उभी नाही राहणार तर कोणाच्या मागे उभी राहणार?’, असं खळबळजनक विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

‘सगळ्यात आधी दीपक केसरकरांना ताब्यात घ्या…’

दरम्यान, दीपक केसरकर यांच्या या विधानाबाबत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, ‘खरं म्हणजे याबद्दल पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. कारण आत्महत्येचा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये घोळतोय आणि ते या केसरकरांना माहिती आहे उद्या जर त्यांनी आत्महत्या केली.. विधानसभेच्या अध्यक्षांनी काही निकाल दिला घटनेला स्मरून.. तर ताबडतोब दीपक केसरकर यांना आतापासून पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे.’

हे ही वाचा >> Video : आमदार गीता जैन यांनी अभियंत्याच्या श्रीमुखात भडकावली, नेमकं काय घडलं?

यामुळे आता या संपूर्ण विधानावरुन नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. अशावेळी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT