अल्पवयीन मुलाने मित्रावर चाकूने वार करत बापादेखत संपवलं, घटनेचा थरार पाहून काळजात धस्स..

मुंबई तक

crime news : अल्पवयीन मुलाने आपल्याकडे बाहुबलीसारखी ताकद असल्याचे दाखवत आपल्याच मित्रावर चाकूने वार करत संपवलं. शिवराज उर्फ युवराज (वय 17) असे मुलाचे नाव आहे. तसेच मृत तरुण हा इयत्ता 12 वी मध्ये शिक्षण घेत होता. मृताचे वडील श्रवण कुमार यांच्या जबाबावरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आपल्याच मुलावर चाकूने वार करताना वडिलांनी पाहिलं

point

आरोपी मुलाचा आणि आपल्या मुलासोबत जूना वाद

Crime News : एका अल्पवयीन मुलाने आपल्याकडे बाहुबलीसारखी ताकद असल्याचे दाखवत आपल्याच मित्रावर चाकूने वार करत संपवलं. मृताचे नाव शिवराज उर्फ युवराज (वय 17) असे आहे. तसेच मृत तरुण हा इयत्ता 12 वी मध्ये शिक्षण घेत होता. मृताचे वडील श्रवण कुमार यांच्या जबाबावरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याचं वृत्त आहे. मृत श्रवण कुमार याच्या वडिलांवरून पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला आहे. 

हे ही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये दोन मित्रांचा बायकोवरून उफळला वाद, दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच संपवलं

आपल्याच मुलावर चाकूने वार करताना वडिलांनी पाहिलं

मृत श्रवण कुमार याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ते कांझिया येथील मध्य विद्यालयात सरस्वतीची मूर्ती पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी पाहिले की, आपल्या मुलासोबत एक अल्पवयीन मुलगा शिवराजच्या मानेवर चाकूने वार करताना दिसत होता. त्यानंतर शिवराज हा रक्ताच्या थारोळ्यात जमीवर कोसळला होता. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याचं चित्र आहे. 

आरोपी मुलाचा आणि आपल्या मुलासोबत जूना वाद

आपल्या मुलाची गंभीर परिस्थिती पाहून शिवराजच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मानेला एक गमछा बांधला, नंतर त्याला रुग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी मुलाचा आणि आपल्या मुलासोबत जूना वाद होता, त्यातून ही घटना घडल्याची माहिती मृत मुलाच्या वडिलांनी दिली होती.

हे ही वाचा : मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 65 वर्षीय महिलेला कारने धडक देत चिरडलं, पुण्यात हिट अँड रनचा थरार सुरुच

पोलिसांचं म्हणणं की, आरोपीच्या अटकेसाठी तपास केला जात आहे. तसेच काही पथक देखील तैनात करण्यात आली आहे. आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळल्या जातील. अशातच मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आल्याचं वृत्त आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp