पिंपरी चिंचवडमध्ये दोन मित्रांचा बायकोवरून उफळला वाद, दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच संपवलं
pimpri crime : पुण्यातील येळवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन मित्रांमधील झालेल्या वादातून एका निष्पाप तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पत्नीवर झालेल्या वादातून मध्यस्ती करणाऱ्या तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वादविवाद मिटवण्याच्या नादात योगेशचाच काढला काटा
दोन व्यक्तींमधील वादात तिसऱ्या व्यक्तीचा जीव गेला
pimpri crime : कृष्णा पांचाळ - पुण्यातील येळवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन मित्रांमधील झालेल्या वादातून एका निष्पाप तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पत्नीवर झालेल्या वादातून मध्यस्ती करणाऱ्या तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या केली. मृत झालेल्या तरुणाचे नाव योगेश धाकतोंडे असे आहे. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी अमोल वाघ या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हे ही वाचा : लग्नाला चाललं होतं कुुटुंब, आईसह 5 वर्षाच्या लेकीचा कुटुंबाच्या डोळ्यादेखत दुर्दैवी अंत
घडलेल्या घटनेनुसार, योगेश धाकतोंडे आणि ऋषिकेश पवार हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद झाला होता. याच वादातून दोघांनी एकमेकांच्या पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, यामुळे दोघांमधील तणाव आणखी वाढू लागला होता.
वादविवाद मिटवण्याच्या नादात योगेशचाच काढला काटा
वादविवाद मिटवण्यासाठी ऋषिकेश पवार हा मित्र योगेश धाकतोंडेसह येळवाडी येथील घरी आला. वाद मिटवण्यासाठी अमोलची पत्नी देखील त्याच ठिकाणी उपस्थित होती. वाद कमी व्हायचा सोडून तो अधिक वाढू लागला होता. संतापाच्याभरात अमोल वाघने ऋषिकेशवर चाकूने हल्ला केला. योगेश धाकतोंडेनं हस्तक्षेप केला असता, अमोलने योगेशवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर योगेश जमिनीवर आदळला असता, नंतर तो गंभीर जखमी झाला आणि नंतर रक्तस्त्राव होऊ लागला.
हे ही वाचा : मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 65 वर्षीय महिलेला कारने धडक देत चिरडलं, पुण्यात हिट अँड रनचा थरार सुरुच
दोन व्यक्तींमधील वादात तिसऱ्या व्यक्तीचा जीव गेला
पोलीस तपासातून समोर आले की, आरोपी अमोल वाघची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याच्याविरुद्ध मनमान परिसरात याआधी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मृत योगेश, आरोपी ऋषिकेश आणि अमोल ड्रायव्हर म्हणून काम करत होते. दोन व्यक्तींमधील वादात तिसऱ्या व्यक्तीचा जीव गेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे,










