लग्नाला चाललं होतं कुटुंब, आईसह 5 वर्षाच्या लेकीचा कुटुंबाच्या डोळ्यादेखत दुर्दैवी अंत

मुंबई तक

Viral News : आई आपल्या पोटच्या लेकीसोबत लग्नासाठी जात होती. तेव्हा तिच्या कुटुंबासोबत इतर काही लोक देखील होते. संपूर्ण कुटुंबातील सदस्य ट्रेन पकडण्यासाठी सिराथू रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. पण नंतर बानो आणि तिची मुलगी हमीरा यांच्यासोबत जे घडले त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं.

ADVERTISEMENT

Viral News
Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मायलेकीचा जागीच मृत्यू

point

कुटुंबाच्या डोळ्या देखत होत्याचं नव्हतं झालं

Viral News : उत्तर प्रदेशातील कौशांबीतील नवान गावातील रहिवासी असलेली बानो (वय 32) ही आपल्या पोटच्या लेकीसोबत लग्नासाठी जात होती. लेकीचं नाव हमीरा फातिमा (वय 5) असे आहे. तेव्हा तिच्या कुटुंबासोबत इतर काही लोक देखील होते. संपूर्ण कुटुंबातील सदस्य ट्रेन पकडण्यासाठी सिराथू रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. पण नंतर बानो आणि तिची मुलगी हमीरा यांच्यासोबत जे घडले त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं. दरम्यान, त्या माय लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.  

हे ही वाचा : मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 65 वर्षीय महिलेला कारने धडक देत चिरडलं, पुण्यात हिट अँड रनचा थरार सुरुच

आई आणि लेकीचं पुढं काय झालं? 

संबंधित कुटुंब हे कानपुरला लग्नासाठी चालले होते. कुटुंबातील सर्व सदस्य ट्रेनची वाट पाहत होते. ट्रेन वेगळ्या प्लॅटफॉर्मवर येत असल्याचे पाहून आई आणि तिच्या मुलीने रेल्वे रुळ ओलांडले असता माय-लेकींचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं आनंदाच्या कार्याला मोठं विरजन प्राप्त झालं.

मायलेकीचा जागीच मृत्यू

मुलीसह आईचे लक्ष नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला. मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्यानं कुटुंबातील सदस्यांना मोठा हादरा बसला आहे. या दुर्दैवी मृत्यूमुळे आनंदात मिठाचा खडा पडल्याचं चित्र निर्माण झालं.  

हे ही वाचा : Govt Job: भारतीय नौदलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! 'या' नव्या भरतीसाठी लवकरच करा अर्ज...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.  या घटनेनं गावात शोक व्यक्त केला जात आहे. आई आणि मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp