मुंबईची खबर: पूल पाडण्याऐवजी मोनोपाइलने नवीन ब्रिज; 'या' कोस्टल रोडवर उभारणार नवा पूल...

मुंबई तक

महानगरपालिकेने उड्डाणपूल न पाडता कोस्टल रोडवर 'मोनोपाइल' टेक्नॉलॉजी (एकच खांब) चा वापर करून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला. हा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी 'आयआयटी'कडून टेक्निकल सल्ला देखील घेतला जात होता.

ADVERTISEMENT

पुल पाडण्याऐवजी मोनोपाइलने नवीन ब्रिज
पुल पाडण्याऐवजी मोनोपाइलने नवीन ब्रिज
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुल पाडण्याऐवजी मोनोपाइलने नवीन ब्रिज

point

मुंबईतील 'या' कोस्टल रोडवर उभारणार नवा पूल...

Mumbai News: मुंबईतील वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड बांधला जात असून मुंबई महानगरपालिकेने या रस्त्यावर नवा पूल बांधण्यासाठी अडथळ ठरत असलेल्या गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल (एमटीएनएल) पाडण्याची योजना आखली होती. स्थानिक पातळीवर विरोध असल्याने, महानगरपालिकेने उड्डाणपूल न पाडता कोस्टल रोडवर 'मोनोपाइल' टेक्नॉलॉजी (एकच खांब) चा वापर करून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला. हा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी 'आयआयटी'कडून टेक्निकल सल्ला देखील घेतला जात होता. 

मोनोपाइल ब्रिज बांधण्यासाठी मंजूरी 

'आयआयटी'च्या रिपोट्सनुसार, मोनोपाइल ब्रिज बांधण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. मात्र, पूलाची बांधणी झाल्यानंतर त्याच्या खांबांमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे, आयआयटी मुंबईने पुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते रुंद करण्याची शिफारस केली आहे. गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल हा MTNL पूल म्हणून देखील ओळखला जातो. हा उड्डाणपूल रेडिसन हॉटेलपासून रुस्तमजी ओझोन क्षेत्रापर्यंत पसरलेला असून 2018 या पुलाचं उद्घाटन मध्ये झालं. त्यावेळी, पूल बनवण्यासाठी 27 कोटी रुपये खर्च झाले होते. 

हे ही वाचा: Govt Job: भारतीय नौदलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! 'या' नव्या भरतीसाठी लवकरच करा अर्ज...

आता, वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड सध्या सहा टप्प्यात बांधला जात असून महानगरपालिकेने कोस्टल रोडला दिंडोशी मार्गे माइंडस्पेस आणि पुढे गोरेगाव मुलुंड लिंक रोडला जोडण्यासाठी वीर सावरकर फ्लायओव्हर पाडण्याचा निर्णय घेतला होता. 

स्थानिकांचा विरोध असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर 

या परिसरात कोस्टल रोडसाठी एक पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. कोस्टल रोड ब्रिजसाठी लागणारी जागा आणि इतर टेक्निकल बाबी लक्षात घेता, वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका महापालिकेने घेतली होती. स्थानिक लोक आणि लोकप्रतिनिधींनी याला तीव्र विरोध केला. त्यानंतर, महानगरपालिकेने मोनोपाइल तंत्रज्ञानाचा वापर करून वीर सावरकर उड्डाणपुलापासून कोस्टल रोडपर्यंत सुरक्षितपणे नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

    follow whatsapp