Govt Job: भारतीय नौदलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! 'या' नव्या भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
भारतीय नौदलात ऑफिसर म्हणजेच अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन नेव्हीकडून विविध शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमीशन ऑफिसर्स (SSC)-जानेवारी 2027 (ST27) कोर्ससाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय नौदलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी!
'या' नव्या भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
Govt Job: भारतीय नौदलात ऑफिसर म्हणजेच अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन नेव्हीकडून विविध शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमीशन ऑफिसर्स (SSC)-जानेवारी 2027 (ST27) कोर्ससाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 24 जानेवारी 2026 रोजी या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 24 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकतात.
एकूण 10 शाखांमध्ये 260 रिक्त पदे
इंडियन नेव्हीच्या या भरतीमध्ये केवळ अविवाहित महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. या भरतीच्या माध्यमातून एक्झिक्यूटिव्ह ब्रांच, लॉजिस्टिक्स, एज्युकेशन, पायलट, सब्मरीन टेक इलेक्ट्रिकल, नेव्हल एअर ऑपरेशन्स, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, इंजीनिअरिंग ब्रांचसह एकूण 10 शाखांमध्ये 260 पदे भरली जाणार आहेत. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना सब लेफ्टनंट पदावर नियुक्त केलं जाईल.
काय आहे पात्रता?
प्रत्येक शाखेसाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह शाखेसाठी, किमान 60 टक्के गुणांसह बीई/ बी.टेक पदवी आवश्यक आहे. पायलट पदांसाठी, 10 वी आणि 12 वीमध्ये 60 टक्के गुणांसह बीई/बी.टेक आणि इंग्रजीमध्ये 60 टक्के गुण अनिवार्य आहेत. तसेच, लॉजिस्टिक्स पदासाठी बीई/ बी.टेक/ एमबीए/ बीएससी/ बी.कॉम/ बीएससी आणि फायनान्स/लॉजिस्टिक्स/एमसीए/एमएससी (आयटी) मध्ये पीजी डिप्लोमा असलेले अर्ज करू शकतात.
हे ही वाचा: वाईतील सराफ व्यावसायिकाचा मुलगा आठ दिवसांपासून बेपत्ता, अखेर पुण्यातील लॉजवर आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
तसेच, इतर पदांसाठी B.E/ B.Tech/ MBA/ B.Com/ B.Sc/ MCA/ M.Sc/ M.A/ M.Tech मध्ये पदवी असणं आवश्यक आहे. भारत सरकारच्या नौवहन आणि वाहतूक मंत्रालयाने जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र असलेले सेकंड मेट, मेट किंवा मास्टर्स पदावर उमेदवार










