4 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता! दोघी यापूर्वीही घर सोडून गेल्या होत्या, कुटुंबीय म्हणाले की...

मुंबई तक

4 अल्पवयीन मुली मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे. पीडित मुलींच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, 18 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या मुलींचा काहीच पत्ता लागू शकला नाही.

ADVERTISEMENT

4 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता!
4 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

4 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता!

point

औरंगाबाद येथील धक्कादायक घटना

Aurangabad Crime: औरंगाबाद येथून 4 अल्पवयीन मुली मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे. पीडित मुलींच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, 18 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या मुलींचा काहीच पत्ता लागू शकला नाही. मुली एखाद्या संघटित टोळीतील लोकांच्या वाईट कृत्याला बळी पडल्या नाहीत ना? अशी त्यांच्या कुटुंबियांना भिती आहे. 

कुटुंबियांनी दाखल केली तक्रार 

संबंधित प्रकरण हे देव पोलीस स्टेशन हद्दीतील तिलौता बिगहा गावातील असल्याची माहिती आहे. बेपत्ता असलेल्या मुलींबद्दल अद्याप कोणतीच माहिती हाती लागलेली नाही. घटनेतील एका बेपत्ता मुलीच्या कुटुंबीयांनी इतर तीन मुलींवर त्यांच्या मुलीला फसवल्याचा आरोप केल्यानंतर 18 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या या मुलींचं प्रकरण उघडकीस आलं आहे. देव पोलीस ठाण्यात कुटुंबियांनी तक्रार दाखल करून मुलीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली. 

हे ही वाचा: वाईतील सराफ व्यावसायिकाचा मुलगा आठ दिवसांपासून बेपत्ता, अखेर पुण्यातील लॉजवर आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

यापूर्वी देखील दोन वेळा घरातून गायब... 

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सर्व्हर स्लो असल्याकारणाने फोनचा सीडीआर अद्याप मिळू शकला नाही. हे प्रकरण लवकरच सोडवलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी सांगितलं की, बेपत्ता झालेल्या चार मुलींपैकी दोन मुली यापूर्वी कोणालाही न कळवता दोन वेळा घराबाहेर पडल्या होत्या, परंतु घरी परतल्यानंतर त्यांनी फिरायला गेलं असल्याचं सांगितलं होतं. 

हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर : वसतीगृहात राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ गुपचूप शूट केले, अन् बॉयफ्रेंडला पाठवले

आता, चार मुली बेपत्ता झाल्याची घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. मुलींचे कुटुंबीय देखील चिंतेत असून पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती आहे. कुटुंबीय पोलिसांशी सतत संपर्कात आहे आणि प्रत्येक संभाव्य दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर आरोपी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp