NCP: ..म्हणून रोहित पवार बारामतीत नव्हते, ‘या’ आमदाराला दिलेला शब्द!
Rohit Pawar: आमदार रोहित पवार हे बारामतीतील दिवाळी कार्यक्रमाला हजर नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं. पण आपण आमदार संदीप क्षीरसागर यांना शब्द दिला होता. त्यामुळे आज बीडमध्ये आलो असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
Rohit Pawar NCP MLA: बीड: ‘दिवाळी पाडव्यानिमित्त प्रथमच पवार कुटुंबातील (Pawar Family) एका व्यक्तीला अशा पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी पाडवा (Padawa) साजरा करावा लागत आहे. परंतु मी संदीप क्षीरसागर यांना शब्द दिला होता. त्यानुसार मी कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहे. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत.’ असे मत आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी बीडमध्ये (Beed) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी ते बारामतीत दिवाळी कार्यक्रमाला का नव्हते याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. (rohit pawar absence from attending the diwali program at baramati But he would have given a word to ncp mla sandeep kshirsagar)
ADVERTISEMENT
‘आम्हालाही तोच संशय’
बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी जो प्रकार घडला त्यावेळी पोलीस हातावर हात ठेवून होते. अगदी साधा सायरनदेखील त्यांनी वाजवला नाही. यामुळे यामागे जे लोक सहभागी आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याची चर्चा सर्वसामान्यमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हालाही तोच संशय असल्याचेही रोहित पवार यांनी मत व्यक्त केले.
हे ही वाचा >> राडा करणाऱ्यांना तोडल्याशिवाय राहणार नाही, माझा हिशोब…: आमदार संजय गायकवाड
वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी भवन हे मुद्दामहून लक्ष केले गेले असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला असून त्यावरून आता आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दामून ओबीसी नेत्यांना पुढे करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक पाहता जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी प्रश्न सोडवण्याची गरज आहे. अशा प्रकारे सभा घेऊन प्रश्न निर्माण करण्यात त्यांचा हेतू काय असा सवालही आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> NCP: शरद पवार म्हणाले ‘तब्येत बरी नाही’, पण अजितदादा तर गेलेले किल्ले पाहायला…
पाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार शरद पवार यांची भेट घेणार का या प्रश्नावर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेतात किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. मात्र ती भेट झाल्यावर सांगता येईल. तर दुसरीकडे अजित पवार यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून कुटुंबातील व्यक्तीला भेटायला काय हरकत आहे असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT