Rupali Chakankar : ‘ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात…’ ,अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rupali chakankar criticize mp supriya sule ajit pawar sunil tatkare ncp crisis election commission
rupali chakankar criticize mp supriya sule ajit pawar sunil tatkare ncp crisis election commission
social share
google news

Rupali Chakankar criticize Supriya Sule : दादांनी 30 वर्षात बारामती उभी केली. दादा, दादा बोलता बोलता यांच राजकीय आयुष्य व्यतीत झाले आहे, असा टोला शुक्रवारी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना लगावला होता. आता या टीकेनंतर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ज्यांच्या जिवावर तुम्ही तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून येतात त्यांनाच प्रश्न विचारता ? असा सवाल चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.(rupali chakankar criticize mp supriya sule ajit pawar sunil tatkare ncp crisis election commission)

रूपाली चाकणकरांची ट्वीटर पोस्ट जशीच्या तशी

तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?

दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?

तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?

ADVERTISEMENT

पाया भरला, विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?

ADVERTISEMENT

नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?

घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?

हे ही वाचा : Gujarat Crime: चप्पल तोंडात घातली, बेल्टने मारलं… बॉस बनली ‘लेडी डॉन’!

सुनील तटकरे काय म्हणाले?

आदरणीय दादांनी 30 वर्षात बारामती उभी केली. दादा, दादा, दादा बोलता बोलता यांच आयुष्य व्यतीत झालं, असा टोला सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. तसेच दादांविरूद्ध याचिका दाखल करताना, मग मात्र सांगणार की राजकीय विचारधारा वेगळी असल्यामुळे आम्ही ते तशापद्धतीने केल्याचे तटकरे यांनी म्हटले. तसेच मला इतकंच म्हणायचय की, 83, 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे देखील सुनील तटकरे म्हणाले आहे.

हे ही वाचा : Ind vs Aus T20 : सूर्या किंवा रिंकू नव्हे, ‘हा’ खेळाडू आहे इंडियाच्या विजयाचा खरा हिरो

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT