Gehlot Vs Pilot : “गेहलोतांच्या नेत्या सोनिया गांधी नव्हे, तर वसुंधरा राजे”

मुंबई तक

ADVERTISEMENT

not sonia gandhi vasundhara raje leader of cm gehlot
not sonia gandhi vasundhara raje leader of cm gehlot
social share
google news

Sachin Pilot Press Conference : राजस्थान निवडणूकीपुर्वी पुन्हा एकदा सचिन पायलट (Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok gehlot) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. कारण कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी थेट पत्रकार परीषद घेऊन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निषाणा साधला आहे. सोनिया गांधी नव्हे तर यांच्या नेत्या वसुंधरा राजे असल्याची टीका सचिन पायलट यांनी केली आहे. या सोबतच पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात जन संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पायलट यांच्या या घोषणेमुळे राजस्थान सरकार बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे.(sachin pilot vs ashok gehlot not sonia gandhi vasundhara raje leader of cm gehlot)

ADVERTISEMENT

अशोक गेहलोत (Ashok gehlot) यांचे मागचे भाषण ऐकल्यावर असे वाटते की,(अशोक गेहलोत) त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नव्हे तर भाजपच्या वसुंधरा राजे सिंधिया आहेत, अशी टीका सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर केली आहे. एकीकडे असे बोलले जाते, राजस्थानमध्ये कॉंग्रेसच्या सरकारला भाजपकडून पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे.तर दुसरीकडे राजस्थान सरकारला वसुंधरा राजेने वाचवल्याचे बोलले जाते.या विधानात खुप विरोधाभास आहे. मला वाटत हे स्पष्ट झाले पाहिजे, असे पायलट म्हणतात.

हे ही वाचा : कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? ‘हा’ नवा चेहरा की जुन्याला लागणार लॉटरी!

मी पहिल्यांदाच असे पाहतोय की, आपल्याच सरकारमधील, आमदार, नेत्यांच्या बदनामीचे काम सुरु आहे. कॉंग्रेस आमदारांची बदनाम केली जातेय आणि भाजप नेत्यांचे कौतुक केले जात आहे,अशी टीका देखील पायलट यांनी केली.आम्हाला सरकारमध्ये नेतृत्व बदल हवा होतो. आम्ही आमचे मुद्दे पक्षप्रमुखासमोर मांडले. अनेक बैठका घेऊन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये एक रोडमॅप तयार झाला. यानंतर कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेतली.अडीच वर्षाचा कार्यकाळ होता,आमच्याकडून शिस्तभंगाचे कोणतेही कृत्य झाले नाही, असे देखील सचिन पायलट म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

जन संघर्ष यात्रा काढणार

कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी आपल्याच सरकारविरोधात जन संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 11 मे पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. हा प्रवास 125 किलोमीटरचा आहे,ज्यामध्ये सचिन पायलट जनतेमध्ये जाऊन त्यांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेणार आहेत. या घोषणेमुळे राजस्थान सरकार बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा उल्लेख, PM नरेंद्र मोदींवर घणाघात; शरद पवार काय बोलले?

पायलट यांचे हुतात्मा स्मारकावर उपोषण

अशोक गेहलोत यांनी वसुंधरा राजे यांच्या काळात झालेले सर्व घोटाळे दडपले आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर आम्ही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे वचन दिले होते. पण संगनमतामुळे या सगळ्या गोष्टी दबून गेल्या. आमचं सरकार स्थापन झाल्यानंतरही आम्ही भ्रष्टाचार प्रकरणांबाबत अनेक दावे केले होते, आजतागायत हे काम झाले नाही. त्यामुळे या गोष्टी समोर येण्यासाठी आणि सरकारकडून न झालेली काम होण्यासाठी 11 एप्रिलला हुतात्मा स्मारकावर सचिन पायलट यांनी एकदिवसीय उपोषण केले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT