Mahrashtra political crisis : याचा अर्थ सरकार बेकायदेशीरपणे घालवलं -संजय राऊत

मुंबई तक

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करताना संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांना निर्णयावरून आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

supreme court judgement on maharashtra political crisis : Sanjay Raut First Reaction
supreme court judgement on maharashtra political crisis : Sanjay Raut First Reaction
Google CTA

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने निकालात महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करताना संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांना निर्णयावरून आवाहन केलं आहे.

संजय राऊत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काय म्हणाले?

-हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. घटनाबाह्य आहे, याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. सोयीचे अर्थ कुणीही लावू नये. शिंदे गटाने बजावलेला व्हीप बेकायदेशीर ठरल्यावर पुढील सर्व प्रक्रिया बेकायदेशीर ठरते.

-कोणत्याही गटाला शिवसेनेवर म्हणजे पक्षावर दावा करता येणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. माझ्या माहितीनुसार राज्यपालांनी घेतलेली प्रत्येक भूमिका ही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. म्हणजे विश्वासदर्शक ठरावापासून ते पुढील प्रत्येक प्रक्रिया त्यांनी राजकीय हेतूनेच केलेली होती.