NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “काळजी करण्याची…”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad pawar's big statement about the post of president of ncp ajit pawar group election commision
sharad pawar's big statement about the post of president of ncp ajit pawar group election commision
social share
google news

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. या फुटीनंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. या सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला होता. या दाव्यावर आता निवडणूक आयोग येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे. या सुनावणी आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (sharad pawar’s big statement about the post of president of ncp ajit pawar group election commision)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवारांनी पक्ष, चिन्हावर दावा ठोकलाच, त्यासोबत त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरही दावा ठोकला होता. या दाव्यानंतर शरद पवारांनी दिल्लीत बैठक घेऊन आपणच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर आता राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह कोणत्या गटाचं, यावर निवडणूक आयोग आता येत्या 6 ऑक्टोंबरला सूनावणी घेणार आहे. या सुनावणीआधीच शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण आहे, हे जनतेला माहिती असल्याचे सूचक विधान केले आहे. शरद पवार जुन्नरमध्ये बोलत होते.

हे ही वाचा : Wagh Nakh : ‘ती’ वाघनखे शिवाजी महाराजांची नाहीत -इतिहास संशोधक सावंत

जनतेला खरी परिस्थिती माहिती आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष कोण आहे, सामान्य माणसाला माहीत आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.जर कोणी वेगळी भूमिका घेतली असेल, तर लोकशाहीत त्यांना अधिकार आहे,त्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. पण आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे लोकांची भावना अनुकूल आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : JNU Controversy : ‘भगवा जलेगा… फ्री कश्मीर…; JNU मधील भिंतीवर वादग्रस्त घोषणा

शरद पवार यांना यावेळी राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनकेंच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले. यावेळी शरद पवार म्हणाले, जुन्नर तालुक्यातील लोक अतुल बेनकेंना कुठला रस्ता योग्य याचे मार्गदर्शन करतील. आणि माझ्या माहितीनूसार जुन्नर तालुक्यातील नागरीकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. तसेच जुनन्नरमधे माझा शब्द डावलला जात नाही असा माझा अनुभव असल्याचे देखील शरद पवारांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि माझा पक्ष आम्ही एकत्रित निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे ही जागा ज्या पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्यांच्याकडे राहिल असे देखील शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT