Shiv Sena MLAs case : शिंदे अपात्र झाल्यास भाजपचा प्लॅन बी काय? समजून घ्या 4 मुद्द्यांत

राहुल गायकवाड

shiv sena mlas disqualification explained in marathi : १६ आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंचे सदस्य रद्द केल्यास भाजपचा प्लॅन बी काय?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

shiv sena mlas disqualification case assembly speaker : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतायेत. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. नार्वेकरांनी कारवाई सुरु केली परंतु त्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात होता. त्यातच ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात कशा पद्धतीने अध्यक्ष कार्यवाही करणार आहेत याचं वेळापत्रक सादर करण्यास सांगितलं. त्याचबरोबर ही हे प्रकरण अनिश्चित काळापर्यंत चालू ठेवता येणार नाही, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे.

पक्षांतर बंदी कायदा व संविधानातील 10 व्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे आणि शिवेसनेचे 16 आमदार अपात्र झाल्यास भाजपकडे कुठला प्लॅन बी असेल हेच आपण समजावून घेऊयात चार मुद्द्यांमध्ये…

पहिला मुद्दा : अजित पवार मुख्यमंत्री होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर सातत्याने अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा होताहेत. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारे फ्लेक्स जागोजागी लावले होते.

हेही वाचा >> महिला आरक्षण विधेयकाला AIMIM चा विरोध का? असदुद्दीन ओवेसींनी सांगितलं कारण

संजय राऊत यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत गेल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरु आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp