Shiv Sena UBT: ‘जे भा%$# आहेत त्यांना तुम्ही घेतलंय…’, उद्धव ठाकरेंची जीभ घसरली

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shiv sena ubt uddhav thackeray tongue slipped while criticizing chief minister eknath shinde and rebel mlas and bjp latest political news maharashtra
shiv sena ubt uddhav thackeray tongue slipped while criticizing chief minister eknath shinde and rebel mlas and bjp latest political news maharashtra
social share
google news

Uddhav Thackeray: मुंबई: शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) तुफान टीका केली. पण याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदारांवर बोलताना ठाकरेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. ‘जे भा%$# आहेत त्यांना तुम्ही घेतलंय.. आणखी कोण भा&$# असेल तर त्यांना तुम्ही घ्या. कारण शिवसेना भाड्यावर चालत नाही.. शिवसेना निष्ठेवर चालते. शिवसेना हिंमतीवर, जिद्दीवर चालते.’ असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. (shiv sena ubt uddhav thackeray tongue slipped while criticizing chief minister eknath shinde and rebel mlas and bjp latest political news maharashtra)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे संतापले, बंडखोर आमदारांबाबत बोलताना जीभ घसरली

उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला भाजपवर टीका करताना म्हटलं की, ‘गॅस सिलेंडर तुम्ही स्वस्त केलं.. माझं म्हणणं आहे की, पेट्रोल आणि डिझेल पण स्वस्त करा. पुढच्या काही चार महिने निवडणूक जिंकण्यासाठी फुकट द्या गॅस सिलेंडर आणि सोबत 500 रुपये द्या.’

‘पेट्रोल भरणाऱ्याला सुद्धा प्रत्येक लीटरमागे 10 रुपये द्या.. देऊ शकतात. कारण एवढं लुटलंय.. एवढं लुटलंय.. त्यामुळे थोडेसे पैसे फेकायला त्यांचं असं काही जात नाही. कारण पुढची कमाई करायचीय त्यांना.’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maratha Akrosh Morcha : ‘…मग आताच का कायदा सुव्यवस्था निर्माण झाली?’ ; राऊतांचा जळजळीत सवाल

‘गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या. पण आज डाळींचे भाव काय आहेत, किती रुपये किलो आहेत? त्यानंतर भाज्या किती महाग होतायेत. गहू, तांदूळ सगळं किती महाग होतंय. गॅस स्वस्त केला तरी त्यावर शिजवायचं काय?’

‘याने काही साधलं जात नाही मग दंगली पेटवायच्या. म्हणजे सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रा त्यांनी जे काही सांगितलंय ते फार भयानक आहे. सत्यपाल मलिक तर एवढ्या टोकाला जाऊन बोलले आहेत की, राम मंदिरावर हल्ला करायला देखील हे मागे-पुढे पाहणार नाहीत.’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंचा तोल ढळला…

दरम्यान, यापुढे बोलताना मात्र, उद्धव ठाकरेंचा तोल ढळला. ‘तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने निवडणुका जिंकता पण येत नाहीए? सगळे भाडोत्री लागतात? म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप की काय? सगळे भाड्याने जमवलेत.. भाड्याने..’

ADVERTISEMENT

‘आमच्याकडे कार्यकर्ते भाड्याने मिळतील. आमच्याकडे खूप आहेत. जे भा%$# आहेत त्यांना तुम्ही घेतलंय.. आणखी कोण भा&$# असेल तर त्यांना तुम्ही घ्या. कारण शिवसेना भाड्यावर चालत नाही.. शिवसेना निष्ठेवर चालते. शिवसेना हिंमतीवर, जिद्दीवर चालते.’ असं वादग्रस्त विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

‘त्यांच्याकडे एकच नेता आहे. तो नेता देखील कमी पडायला लागलाय म्हणून बाजूला आपल्या साहेबांचा फोटो लावावा लागतोय. बजरंग बली की जय करावं लागतंय. कदाचित 23 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन करतायेत..

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘भाजप म्हणजे भाड्याने जमवलेला पक्ष’,ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

‘अहो पण तुमचं कर्तृत्व काय.. ते त्यांच्या कर्तृत्वावर हिंदुहृदयसम्राट झाले. तुमच्या कर्तृत्वाने किंवा आशीर्वादाने ते नव्हते तर त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही आहात.’ असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT