Nashik: ‘कोणी मोदीजींच्या पाया पडतं, तर कोणी Selfie…’, CM शिंदे PM मोदींबद्दल का म्हणाले असं?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

someone falls at modiji feet and some prime ministers takes selfie cm eknath shinde praises pm modi in nashik
someone falls at modiji feet and some prime ministers takes selfie cm eknath shinde praises pm modi in nashik
social share
google news

CM Shinde and PM Modi: नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (12 जानेवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात नाशिकमधील काळाराम मंदिरापासून सुरू झाली आहे. यानंतर नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधान मोदींवर बरीच स्तुतीसुमनं उधळली. तसंच लक्षद्वीपवरून (Lakshadweep)झालेल्या वादाबाबतही त्यांनी एक वक्तव्य यावेळी केलं आहे. (someone falls at modiji feet and some prime ministers takes selfie cm eknath shinde praises pm modi in nashik)

‘मोदीजी हे लक्षद्वीपला काय गेले तर तिकडे मालदीवला भूकंप आला..’ असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींसमोरच केलं. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीप दौऱ्यावर असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले. तसंच येथे पर्यटकांनी भेट द्यावे असं आवाहनही केलं होतं. पण यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांनी मोदींच्या या आवाहनवर आक्षेपार्ह टीका केली होती.

हे ही वाचा >> Shiv Sena : ठाकरेंच्या सहीचा AB फॉर्म शिंदेंना कसा चालला? नार्वेकर म्हणाले…

ज्याच्या संतप्त प्रतिक्रिया या देशभर उमटल्या. भारतातील अनेक नागरिकांनी आपली मालदीव टूरचं बुकिंग रद्द केलेलं. तर अनेकांनी येथील विमान तिकटीही रद्द केली होती. ज्याचा थेट फटका हा मालदीवच्या पर्यटनाला बसला. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी आज वक्तव्य केलं. तसंच पतंप्रधान मोदींची बरीच स्तुती देखील केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले…

अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर होत आहे.. त्यामुळे पंतप्रधान यांचे आभार शब्दात मांडता येणार नाही.. फक्त एवढंच म्हणेन की, ‘मोदी है तो मुमकीन है…’ आमचे मोदीजी हे लक्षद्वीपला काय गेले तर तिकडे मालदीवला भूकंप आला.. आता आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. हे फक्त आणि फक्त आमच्या पंतप्रधानांमुळे हे सगळं होतं आहे.

अनेक देशाचे अध्यक्ष असो, पंतप्रधान असो.. कोणी आपल्या पंतप्रधानांसोबत सेल्फी घेतोय, कोणी बॉस म्हणतं.. तर कोणी वाकून नमस्कार करतं. ही आमच्यासाठी खूप-खूप अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण देशवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आपला देश महासत्तेकडे जात आहे. आपला देश अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावर होता. जो मोदींजींनी 5 व्या क्रमांकावर आणलाय. आता तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा >> PM Modi Anushthan : मोदी करणार आहेत ते 11 दिवसांचं अनुष्ठान नेमकं काय?

दरम्यान, नाशिकमधील विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईत येणार आहेत. येथे ते मुंबई-न्हावा शेवा या सर्वात मोठ्या सागरी सेतूचं उद्घाटन करणार आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT