“उद्धवजी, पुन्हा एकदा शांतीने विचार करा”, फडणवीसांची भेट, सुधीर मुनगंटीवारांची ऑफर?
sudhir mungantiwar-uddhav thackeray news: वृक्ष लागवड योजनेसंदर्भात चर्चा सुरू असताना सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना फुटीचा मुद्दा छेडला. यावेळी मुनगंटीवारांना ऑफर वजा सल्लाही दिला.
ADVERTISEMENT
Sudhir Mungantiwar offer to Uddhav Thackeray: विधानभवन परिसरात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा रंगलेली असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या ऑफरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
ADVERTISEMENT
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वृक्ष लागवडीसंदर्भात प्रश्न विचारला. “सुधीर मुनगंटीवारांचा उद्देश चांगला आहे, पण अधिकार प्रतिसाद देत नाहीये. इको बटालियन सारख्या संस्था महाराष्ट्र देणार का?, असं अंबादास दानवे म्हणाले.
या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांना माझं आवाहन आहे की, आपण आमदार निधीतून रस्ते करतो, इतर कामं करतो. मी आवाहन करेन की, यासाठी मी जीआर काढला की, कमीत कमी 25 लाखांची झाडं मतदारसंघात लावावी.”
हे वाचलं का?
संजय राऊतांचं संसदेतलं पद गेलं, ठाकरेंना शिंदेंकडून आणखी एक झटका!
“आपल्या आयुष्यात निसर्ग आपल्याला आजच्या बाजारभावाप्रमाणे साधारणतः 6 कोटी 13 लाख 20 हजार रुपयांचा ऑक्सिजन देतो. एक रुपया टॅक्स नाही. एक रुपयाचे बिल आम्ही पाठवत नाही. त्या मोबदल्यात आपण देतोय? ऑक्सिजन घेतोय, पण त्या मोबदल्यात काही द्यायची वृत्ती आपल्या सर्वांची असेल, तर मग ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांचीच राहील. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांची होऊ नये हा माझा पहिल्या दिवशीपासूनचा आग्रह होता.”
“लोकसहभागातून योजना व्हावी. मला आनंद आहे की, 2016 मध्ये या योजनेची सुरूवात केली, तेव्हा या राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, उद्धवजी स्वतः आहेत. कार्यक्रमाला उद्धवजी आले. शरद पवार स्वतः झाडे लावायला गेले”, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर ठाकरे म्हणाले, “झाडाला फळं नाही आली.”
ADVERTISEMENT
‘जोडे मारायची ही पद्धत सुरू झाली, तर…’, अजित पवार चिडले, फडणवीसही झाले आक्रमक
ADVERTISEMENT
मी एकदा नाही, तिनदा विनंती केली; सुधीर मुनगंटीवार सभागृहात काय म्हणाले?
त्याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “झाडाला फळं येण्यासाठी… उद्धवजी मी अनेकदा व्यक्तिगत तुम्हाला भेटून सांगायचो की, फळं येतील. पण, तुम्ही झाडांशी नातं तोडलं. त्याला काय करणार? मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की, उद्धवजी या झाडाला कोणते खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरेच खत दिले. त्याच्यामुळे झाडाला फळे कशी येतील. मी एकदा नाही, तिनदा विनंती केली.”
Sudhir Mungantiwar Uddhav Thackeray : “आताही काही बिघडले नाही”
“खतच होते फक्त तुमच्या निरमा पॉकेटमध्ये आलेले… तुमचा गैरसमज झाला आणि तुम्ही त्याच्या नाव दुसरे होते, झाड जाळणारे होते, ते टाकले. आताही काही बिघडले नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार करा”, असं म्हणून सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “झाड वाढवायचा. आपला प्रश्न झाडांचा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT