ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी फेटाळली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर न्यायालयाने आयोगाकडून उत्तर मागितले आहे. यासाठी आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
Supreme Court : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी फेटाळून लावली. मात्र, या प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. याचिकांमध्ये विशेष पुनरावलोकन (SIR), फॉर्म-6 मधील बदल आणि निवडणूक आयोगाच्या इतर निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे निर्णय कायद्यात ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे उल्लंघन करून घेण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा : Astrology : करिअर, पैसा आणि नातेसंबंध... केतूचे मघा नक्षत्रातून भ्रमण, 'या' राशींना लाभ
संबंधित कायद्याला आव्हान देणारे प्रकरण आधीच प्रलंबित- सुप्रीम कोर्ट
याचिका सामाजिक कार्यकर्ते राकेश कुमार सिंह आणि वकील शैलेंद्र मणि त्रिपाठी यांनी दाखल केल्या आहेत. राकेश कुमार सिंह यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी बाजू मांडली. त्यांनी लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या मूळ स्वरूपासह त्यात करण्यात आलेल्या बदलांचा आणि कलम 10 (2) आणि 10 (3) चा दाखला दिला. नव्या कायद्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांना अत्यंत शक्तिशाली बनवण्यात आल्याचा युक्तिवाद विकास सिंह यांनी केला. निवृत्तीनंतरही CEC यांना चौकशीपासून संरक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी पदावर असताना संरक्षण यापूर्वीही कायद्यात असल्याचे नमूद केले. मात्र, आता निवृत्तीनंतरही संरक्षण मिळत असल्याचे विकास सिंह यांनी सांगितले. संबंधित कायद्याला आव्हान देणारे प्रकरण आधीच प्रलंबित असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.
हेही वाचा : सिंगर रॉकसनने शब्दांनी MPSC चं आंदोलन गाजवलं.. व्हायरल भाषण
