Tanaji Sawant : ''आम्ही उडत्याचे मोजतो'', मंत्री तानाजी सावंतांची शेतकऱ्यासमोर मुजोर भाषा
Tanaji Sawant : एका शेतकऱ्याने प्रश्न विचारताच तानाजी सावंत प्रचंड चिडले आणि त्यांनी शेतकऱ्याची औकातच काढली. ''सुपारी घेऊन कार्यक्रमात उभं राहून बोलायचं नाही, औकातीत राहून बोलायचं, औकातीत राहून विकास करून घ्यायचा, आम्ही उडत्याचे मोजतो'', अशा शब्दात तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना दमबाजी केली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
''सुपारी घेऊन कार्यक्रमात उभं राहून बोलायचं नाही''
''औकातीत राहायचं, औकातीत राहून विकास करून घ्यायचा''
तानाजी सावंताची शेतकऱ्याला दमबाजी
Tanaji Sawant News : गणेश जाधव, धाराशिव : आरोग्य मंत्री तानाजी सावंत सध्या गाव संवाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान एका शेतकऱ्याने प्रश्न विचारताच तानाजी सावंत प्रचंड चिडले आणि त्यांनी शेतकऱ्याची औकातच काढली. ''सुपारी घेऊन कार्यक्रमात उभं राहून बोलायचं नाही, औकातीत राहून बोलायचं, औकातीत राहून विकास करून घ्यायचा, आम्ही उडत्याचे मोजतो'', अशा शब्दात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शेतकऱ्यांना दमबाजी केली. (tanaji sawant angry on farmer question on village tour maharashtra politics)
ADVERTISEMENT
भूम परंडा मतदार संघातील वाशि या तालुक्यात डोंगरवाडी गावात पालकमंत्री तानाजी सावंत यांचा गाव संवाद दौरा चालू होता. यावेळी तानाजी सावंत गावामध्ये बंधाऱ्याच्या कामाविषयी सांगत होते. यावेळी गावातील गावकऱ्यांनी बंधाऱ्यास गेट बसवून प्रश्न मिटणार नाहीत असे म्हणताच डॉक्टर तानाजी सावंत गावकऱ्यांवरती भलतेच भडकले.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : खरंच 31 ऑगस्टला अर्जाची मुदत संपतेय का...काय आहे शेवटची तारीख?
तानाजी सावंत काय बोलले?
''खाली बसा आपण विकासाचं बोलायला आलो आहोत. मी इंजीनियर आहे टेक्निकल आहे. एखाद्याची सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. पंधरा वर्षे आपण कधी ब्र शब्द काढला नाही रस्त्यावर कोणी मूठभर किंवा पाठीवर मुरूम टाकला नाही. बंधारा बांधला नाही की झालं का बघितलं नाही की पाणी किती अडतय हे बघितलं नाही. गेली 35 वर्ष झालं फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं 16000 कोटीचे बजेट आपण टाकून या शिवारात पाणी आणतोय याचा विचार करायचा नाही करायचा.
हे वाचलं का?
''आम्हालाही कळत कोणाची तरी सुपारी घ्यायची उभा राहून बोलायचं आणि चांगल्या कामात मिठाच्या खडा टाकायचा आम्हीही उडत्याची मोजतो आपापल्या औकातीत राहून बोलायचं औकातीत राहून विकास करायचा'' असे म्हणत तानाजी सावंत यांनी ग्रामस्थ्यांना दम दिला आहे.
हे ही वाचा : महायुतीत रंगलं महाभारत! तानाजी सावंतांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यानंतर NCP ला संताप अनावर!
''व्यक्ती बघून मतदान करायचं नाही. पाहुण्यांना पाहून मतदान करायचं नाही. भावनिक होऊन तर मतदान अजिबात करायचं नाही. जो आपला प्रश्न सोडवेल. आपल्या लेकरा-बाळाचा प्रश्न सोडवेन. पुढील पिढीचा विचार करुन विकास आणेल. त्यालाच मतदान करायचं. उद्या तानाजी सावंतने इथला विकास नाही केला, तुमचं काम केलं नाही, त्याला वेशीच्या आत येऊ द्यायचं नाही. हे मी स्वत: तुम्हाला सांगतो. विकास होत असेल विकास केला असेल तरच मतदान करायचं. हे मी सांगतोय'', असे देखील तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT