Maratha Morcha : उदयनराजेंनी उद्धव ठाकरेंच्या सरकारवरच फोडलं खापर, म्हणाले…
Udayanraje Bhonsle : मराठा आरक्षणावरून जे विरोधक आज सरकारवर टीका करतात. त्यांनी आपल्या कारकीर्दीत न्यायालयात ठाम भूमिका का मांडली नाही. त्यामुळे आज सरकारवर टीका करताना विरोधकांनी एकदा आरशासमोर उभा राहून पाहावं अशी टीका त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
Udayanraje Bhonsle : मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन चालू असताना जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जो प्रकार घडला आहे त्याचा आम्ही निषेधच करत असल्याचे उदयनराजे यांनी मत व्यक्त केले. मात्र जालन्यातील त्या घटनेचे कोणीही राजकारण करु नये. कारण आज जे राजकारण करत आहेत, त्यांनी सत्तेत असताना मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) काय केले असा सवालही उदयनराजे (Udayanraje bhosale) यांनी केला आहे. विरोधकांनी सत्तेत असताना कोणताही पुढाकार घेतला नाही त्याचबरोबर आरक्षण मिळण्यासाठी कोणतंही पाऊल उचललं नाही. तरीही आज जालन्यातील घटनेवर राजकराण केले जात आहे. त्यामुळे यावर कोणीही राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला राजकारण कसं मिळेल हे पाहावे लागेलअसं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. (udayanraje bhosale criticizes maratha reservation mahavikas aghadi for delay in court)
ADVERTISEMENT
आरक्षणाचं राजकारण करु नये
उदयनराजे यांनी जालन्यातील मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी तिथे शरद पवार यांचीही उपस्थिती होती. जालन्यातील लाठीहल्ल्यानंतर उदयनराजे यांनी बोलताना विरोधकांवर टीका केली. आज जे सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. ते कधी तरी सत्तेत होते. त्यावेळेपासूनच मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. त्यावेळी न्यायालयात योग्य पाठपुरावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला नसल्यामुळेच न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा टिकू शकला नाही असा गंभीरा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्यांनी आरक्षणाचं राजकारण करु नये असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा >> Rohini Khadse : मुक्ताईनगरचा MVA चा उमेदवार ठरला! रोहित पवारांनी केली मोठी घोषणा
जनतेत अफवा पसरवण्याचं काम
मराठा आक्रोश मोर्चाच्या आंदोलनवार पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यानंतर विरोधकांनी सरकार गंभीर आरोप केले आहेत. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी सहभागी आंदोलकांवर लाठीहल्ला केला. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारच्या सुचनेनुसारच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उदयनराजे यांनी म्हटले या प्रकारच्या खोट्या अफवा लोकांमध्ये पसरवण्याचं काम करु नये असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
हे वाचलं का?
सत्तेत असताना पुढाकार घेतला नाही
मराठा आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली. मात्र ज्या वेळी महाविकास आघाडी सत्तेत होती त्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला गेला नाही. त्यांनी का पुढाकार घेतला नाही. महाविकास आघाडीमुळेच न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकलं नाही असा गंभीर आरोपही त्यांनी तत्कालीन सरकारवर केला आहे.
नाकर्तेपणामुळे न्यायालयात आरक्षण टिकलं नाही
महाविकास आघाडी सत्तेत असल्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. न्यायालयीन लढाही त्यावेळेपासून चालू आहे. मात्र तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकू शकला नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Sanjay Raut :’…तो अदृश्य फोन कोणाचा ?’; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
संपूर्ण ताकदीने लक्ष घालू
उदयनराजे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता मराठा आरक्षणाकडे गंभीरपणे लक्ष घालून न्यायालयात त्यासाठी लढा देऊ. मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे. त्याचा पाठपुरावा करुन आम्ही मराठा आरक्षणासाठी ताकदीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
त्यांनी आरशासमोर उभा राहावं
मराठा आंदोलनाच्या विषयावर विरोधकांकडून टीका केली जाते आहे. मात्र त्यांनी एकदा आरशासमोर उभा राहावं आणि आपण यासाठी काय केले तेही पाहावं असा टोला त्यांनी महाविकास आघाडीसह विरोधकांवर केला आहे. महाविकास आघाडी जरी आज टीका करत असली तरी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात ठोस भूमिका का मांडली नाही असा सवाल त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT