Uddhav Thackeray : 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर मोदींचं मौन, ठाकरेंनी घेतली फिरकी; म्हणाले…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticized pm narendra modi maharashtra visit sharad pawar raigad news
uddhav thackeray criticized pm narendra modi maharashtra visit sharad pawar raigad news
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरूवारी शिर्डीत शरद पवारांचा (Sharad Pawar) नामोल्लेख टाळत कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला होता. यावेळी व्यासपीठावर अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे यावेळच्या दौऱ्यात मोदींनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करण्याचे टाळले होते. हाच धागा पकडून आता उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी पंतप्रधान मोदींची फिरकी घेतली आहे. नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. (uddhav thackeray criticized pm narendra modi maharashtra visit sharad pawar raigad news)

रायगडमध्ये आज महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर आरक्षणावर बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यावर काहीच बोलले नाहीत. मणिपूर पेटतंय, आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उरतायत,आत्महत्या करतायत, पण ज्वलंत प्रश्नावर बोलायचं नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावला.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र’- मनोज जरांगे पाटील

पंतप्रधानांनी 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप काल का नाही केला, कारण ते बाजूला बसलेले ना, असे विधान करून ठाकरेंनी मोदींची फिरकी घेतली. तसचे पंतप्रधानांच्या शरद पवारांवरील टीकेलाही ठाकरेंनी उत्तर दिले. 70 हजार कोटींची कर्जमाफी पवार साहेब कृषीमंत्री असताना केले होती, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ठाकरे पुढे म्हणाले, आज अनेकांनी म्हटलं इंडियाची मिटींग आहे. पण इंडियाची मिटींग इतक्या मंडपात होणार नाही, तर ती संपूर्ण भारतभर होणार आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या नव्हे तर वृत्तीच्या विरोधात आहोत. आणि हुकुमशाहीला गाडण्यासाठी एकत्र आल्याची टीका ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांवर खास शैलीत टोलेबाजी

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला खास शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टोलेबाजी केली. सभेतल्या रिकाम्या खुर्च्या पाहुत आताच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलो की काय? असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला. तसेच आतमध्ये मंत्रिपदाच्या खुर्चीवरून भांडणे  आणि सभेत खु्र्च्या रिकाम्या अशी खिल्ली देखील ठाकरेंनी सरकारची उडवली. छत्रपती शिवाजी महाराज शत्रुंना कसे टकमक टोक दाखवायचे, तसे राजकारणात इथल्या गद्दारांना टकमक टोक दाखवण्याची वेळ आलीय. छत्रपतींच्या मातीत जर गद्दार जन्मलेले आणि ते दिल्लीश्वरांसमोर झूकत असतील तर त्यांना नुसत झुकवले नाही तर सपाट करून टाकले पाहिजे, अशी टीका देखील ठाकरेंनी शिंदेवर केली.

हे ही वाचा : Crime : डेटिंग अ‍ॅपवर मैत्री, गोड बोलून फ्लॅटवर नेलं; तरूणाने…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT