फडणवीसांचा हास्यजत्रेतला प्रयोग, अन् अवली लवली, उद्धव ठाकरेंची टीका
कोविडची वॅक्सीन मोदीजींनी तयार केली असा व्हिडीओतल्या संवादाचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ”कोविडची लस मोदींनी तयार केली मग संशोधक गवत उपटत बसले होते, अशी टीका ठाकरेंनी मोदींवर केली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या वर्धापण दिनी ठाकरी तोफ धडाडली आहे.उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी कोविडची वॅक्सीन मोदीजींनी तयार केली असा व्हिडीओतल्या संवादाचा संदर्भ देत टीका केली आहे. ”कोविडची लस मोदींनी तयार केली मग संशोधक काय गवत उपटत बसले होते, अशी टीका ठाकरेंनी मोदींवर केली आहे. (udhhav thackeray criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on shivesena anniversari meeting)
ADVERTISEMENT
शिंदे भाजपचीच पुंगी वाजवतील…
उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच गर्दी आणि गार्दी याचा अर्थ सांगताना मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली. ही येथे जमलेली खरी गर्दी आहे, आणि गार्दी याचा अर्थ पेशवेकाळात लढ्यामध्ये गोंधळ घालायला, वसुली करायला, अशा काही भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या, तशी गार्दींची टोळी तिकडे जमलीय, असा टोला सुरुवातालीच ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. ही भाडोत्री माणस नाही आहेत. पैसे देऊन आलेले नाही आहेत. 57 वर्षाची ही तपस्या आहे. रक्त सांडून, घाम गाळून मेहनतीने हे सर्व शिवसैनिक उभे राहिले आहेत, आणि त्यांनी तुम्हाला उभं केलय. आज आयत्या बिळावर फणा काढून नागोबा झालात. हे (शिंदे) भाजपचा जिथपर्यत उपयोग आहे तिथपर्यंत दुध पाजतील. नंतर पुंगी वाजवून टोपलीन घालून सोडून देतील, अशी टीका देखील ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.
हे ही वाचा : BMC: उद्धव ठाकरेंना घेरलं, ‘त्या’ प्रकरणी फडणवीसांकडून प्रचंड मोठी घोषणा
सभेत फडणवीसांचा व्हिडिओ लावला
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाला हास्यजत्रेतला प्रयोग अशी उपमा देत खिल्ली उडवली. तसेच यानंतर देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओही ऐकवला. या व्हिडिओत, ”आज आपण इथे बसू शकलो कारण कोविडची वॅक्सीन मोदीजींनी तयार केली”, असे देवेंद्र फडणवीस बोलताना दिसले. या व्हिडिओचा संदर्भ घेत, उद्धव ठाकरे यांनी कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते. संशोधक गवत उपटत बसले होते, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. हे असे सगळे अंधभक्त आहेत, त्यांचे गुरू म्हटल्यानंतर खऱोखर त्यांना कोणती वॅक्सीन द्यावे लागेल हे पाहाव लागेल. समीर चौंगुलेच्या रुग्णालयात समुपदेशनासाठी या मानसिक रूग्णांना नेले पाहिजे. कारण सगळे अवली आहेत, एका पेक्षा एक, अवली लवली कोणीच नाही,अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच तुम्ही अवली असलात तरी जनता कावली असेल, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
लाचार मिंधे म्हणतात सुर्यावरती थुंकु नका, कोण सुर्य, कसला सुर्य. तुमचा सु्र्य मणिपुरमध्ये का उगत नाही. तिकडे उगवणार नसेल तर सुर्याचे काय करायचे, अशी टीका देखील ठाकरेंनी मोंदींवर केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, कोर्टाचा निकाल लागलाय, तो निकाल लागल्यानंतर यांना फिरतीचा अनुभव उपयोगाला येईल. टुरीस्ट कंपनी काढायला चांगले पडेल. सुरतेला गेलात तर कुठे राहाल, गुवाहाटी गेलात तर काय पाहाल, रेडा कुठे कापाल, टेबलावर कुठे नाचाल, दिल्लीत मुजरा कसा करायचा.. हे सगळे अनुभव गाठीशी आली आहेत, अशी खिल्ली देखील ठाकरेंनी यावेळी उडवली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘ठाकरेंचं भाषण नव्हे, ओकारी..’, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
तुम्ही बाळासाहेबांचे फोटो चोरा पण कार्यकर्त्यांच्या मनातले फोटो चोरू शकत नाही, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच अजूनही काही जण जातात. जाऊ देत, कोणी इथून गेले की माध्यमांमध्ये धक्का, अरे कसला धक्का, शिवसेना धक्काप्रुफ आहे.यांचे रोज फोन चालू आहेत, अरे इतकी तसदी घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे यादी पाठवा. भाडोत्री, बिकाऊ असतील ते घेऊन जा, मीच त्यांना पाठवून देतो, आणि पुन्हा एकदा यांच्या छाताडावरती शिवसेनेचा भगवा आम्ही रोवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT