Madha Lok Sabha 2024 : 'पवारांनीच मोहिते पाटलांचं राजकारण संपवलं होतं', फडणवीसांचा गंभीर आरोप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize sharad pawar vijaysingh mohite patil politics madha lok sabha election 2024 ranjeet singh mohite patil
मोदी है तो मुमकीन है, बाकी आमचा प्रयत्न सगळ्यांना एकत्रित आणायचाच असतो.
social share
google news

Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar : माढा लोकसभा मतदार संघात राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभांचा धडाका लावला आहे.  या सभेदरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. शरद पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण संपवलं होतं. त्यावेळी आम्ही त्याच्या पाठिशी उभे राहिलो होतो. आता त्यांना काय करायचे आहे. हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असे म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर टीका केली. (devendra fadnavis criticize sharad pawar vijaysingh mohite patil politics madha lok sabha election 2024 ranjeet singh mohite patil) 
 
देवेंद्र फडणवीस अकलूजमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ''आम्ही प्रत्येक टीकेला कृतीतून उत्तर देतो. शेवटी लोकांनी दिसतंय. ज्यावेळी पवार साहेबांनी (मोहिते पाटलांच) राजकारण जवळ जवळ संपुष्टात आणलं होतं, त्यावेळी आम्ही त्याच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याही घरात सगळ्यांनाही हे पटलंय अशी परिस्थिती आहे. पण ठिक आहे त्यावर मी काही बोलणार नाही. मला बोलायचं नाही. त्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहिलो आता त्यांना काय करायचे आहे. हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे'', असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : भाजपने का दिलं तिकीट? अखेर उज्ज्वल निकमांनीच दिलं उत्तर

लोकसभेचे दोन टप्पे पार पडले आहेत. हे दोनही टप्पे आम्ही 2-0 ने जिंकले आहेत. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे. दोन्ही टप्प्यामध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळाले आहे आणि लोकसभेत आमचा चांगला विजय होणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे, असे विधान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले होते. भुजबळांच्या या विधानावर बोलताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही भुजबळांच वाक्य पुर्ण ऐकलेलं नाही. अलिकडच्या काळात अर्धवट वाक्य काढायचं आणि त्याच्यावर दिवसभर मीडिया चालवायचा अशा प्रकारची पद्धत आहे. एकदा त्यांच सगळं वक्तव्य ऐकलं तर तुम्ही प्रश्न करणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha election Live : भाजपने कापलं तिकीट, पूनम महाजन म्हणाल्या...

तसेच निंबाळकर घराण एकत्रित दिसणार का? असा सवाल पत्रकारांनी फडणवीसांना केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मोदी है तो मुमकीन है, बाकी आमचा प्रयत्न सगळ्यांना एकत्रित आणायचाच असतो. विभाजन करणारे आम्ही नाही आहोत.आता काय होत ते पुढे पाहत राहा, असे ते म्हणाले. 

महाविकास आघाडीला मोठा धक्का 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची आज अकलूजमध्ये सभा पार पडणार आहे. या सभेपुर्वी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांची प्रतापगड या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यासोबत धवलसिंह मोहिते पाटलांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला आणि मोहिते पाटील कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT