Tata Airbus Project : ‘उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी’; अनिल देशमुखांचं नाव घेत भाजपचं टीकास्त्र
वेदांता सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्ट पाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला टाटा एअरबस प्रोजेक्टसाठी गुजरातची निवड करण्यात आलीये. त्यावरूनच राज्यातल्या राजकीय वर्तुळात रणकंदन सुरू झालंय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातल्या () नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपला लक्ष्य केलं जातंय. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपनं आता थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केलीये. टाटा […]
ADVERTISEMENT

वेदांता सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्ट पाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला टाटा एअरबस प्रोजेक्टसाठी गुजरातची निवड करण्यात आलीये. त्यावरूनच राज्यातल्या राजकीय वर्तुळात रणकंदन सुरू झालंय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातल्या () नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपला लक्ष्य केलं जातंय. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपनं आता थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केलीये.
टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनीही टीकास्त्र डागलंय.
विरोधकांकडून टीका होत असताना आता महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवर एक सविस्तर पोस्ट करण्यात आलीये. त्यातून महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवण्यात आला असून, उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलंय.
फाॅक्सकाॅनपाठोपाठ एअरबसचा महाराष्ट्राला ‘टाटा’ : 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला