दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यालाच केलं किडनॅप; केली ही मागणी
पाकिस्तानात नेहमी काही ना काही घडत असतं. याठिकाणी दहशतवाद्यांचे तळ असल्याने, विविध घटना घडत असतात. आता तर थेट दहशतवाद्यांनी तेथील मंत्र्याचंच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी करत दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (केपी) ला गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) ला जोडणारा मुख्य रस्ता अडवला. या रस्त्याला वेढा घालून दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ […]
ADVERTISEMENT

पाकिस्तानात नेहमी काही ना काही घडत असतं. याठिकाणी दहशतवाद्यांचे तळ असल्याने, विविध घटना घडत असतात. आता तर थेट दहशतवाद्यांनी तेथील मंत्र्याचंच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी करत दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (केपी) ला गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) ला जोडणारा मुख्य रस्ता अडवला. या रस्त्याला वेढा घालून दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ मंत्री आणि अनेक पर्यटकांचे अपहरण केले आहे.
सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी
शनिवारी डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एका वरिष्ठ मंत्री आणि अनेक पर्यटकांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या दहशतवाद्यांनी नंगा पर्वत प्रदेशात परदेशी नागरिकांची भीषण हत्या केली होती आणि डायमेरमधील इतर दहशतवादी घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. आता या दहशतवाद्यांनी तुरुंगात असलेल्या सहकाऱ्यांना जोपर्यंत सोडलं जात नाही, तोपर्यंत मंत्र्याला सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळं पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. थेट मंत्र्यालाच किडनॅप केल्याने सामन्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
दहशतवाद्यांनी मंत्र्याचा व्हिडिओ जारी केला