Eknath Khadse : "महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार कधीही कोसळू शकतं"

राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं मत
The Shinde Fadnavis government in Maharashtra can collapse anytime Says Eknath Khadse
The Shinde Fadnavis government in Maharashtra can collapse anytime Says Eknath Khadse

महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. राज्यघटनेच्या दहाव्या तरतुदीनुसार पूर्वी अनेक निर्णय असे झाले आहेत. त्यामुळे हे सरकार टीकेल असं वाटत नाही. हे सरकार कधीही कोसळू शकतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हे सरकार कोसळू शकतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं

२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं आणि भाजपच्या सोबत गेले. त्यांच्यासोबत ४० आमदार आहेत. तसंच शिवसेनेचे अनेक नेते त्यांच्यासोबत येत आहेत. त्यामुळे शिवसेना दुभंगली आहे. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेनेची पुनर्बांधणी करत आहेत. आता सगळ्यात पुढे काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशात एकनाथ खडसे यांनी हे सरकार कोसळू शकतं असं म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी काय म्हटलं आहे शिंदे फडणवीस सरकारबाबत?

या सरकारच्या विरोधात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. अरूणाचल प्रदेशच्या बाबतीत एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. तिथलं सरकार टीकलं नाही. त्या परिस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत विशेष फरक नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हे सरकार राहिल की नाही हे सांगता येत नाही. हे सरकार कोसळू शकतं. या सरकारला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बरखास्तीचा धोका आहे.

जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा नीट विचार केला तर जे १६ आमदारांचं निलंबन जर केलं गेलं तर किंवा ते अपात्र ठरले तर परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल? ते पाहणं महत्त्वाचं आहे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मला वाटत नाही १ ऑगस्टलाच हा निर्णय होईल कदाचित पुढच्या तारखा दिल्या जाऊ शकतात.

एवढंच नाही तर जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटतं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार न्यायालयाच्या निर्णयाशिवाय होऊ नये असं मत मुख्यमंत्र्यांचं आहे. त्यामुळे या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल असं वाटत नाही असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in