एकनाथ शिंदेंचं बंड : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस-अमित शाहांना फोन, दहा दिवसांत काय घडलं?

uddhav thackeray calls to devendra fadnavis : सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून अमित शाह यांनाही गेला होता फोन
uddhav thackeray calls to devendra fadnavis
uddhav thackeray calls to devendra fadnavis

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेतृत्वापासून ते दिल्लीपर्यंत फोनाफोनी केल्याची मोठी माहिती आता समोर आलीये. एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.

२१ जून २०२२. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निकालानंतरचा दुसरा दिवस. विजयाचा गुलाल खाली बसत नाही, तोच मोठी बातमी समोर झाली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील २६ आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत गाठलं.

uddhav thackeray calls to devendra fadnavis
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार?; शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उफाळून आलेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे तत्कालीन सरकार वाचवण्यासाठी आणि पक्षाची एकजूट कायम ठेवण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आमदार सुरतवरून गुवाहाटीला गेले. त्याचबरोबर सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असलेले आमदारही शिंदे गटात निघून जाण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शिवसेनेला एकापाठोपाठ झटके बसू लागले.

इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षातील आमदार शिंदे गटात जाऊ लागल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या एका नेत्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना संपर्क केला. उद्धव ठाकरे हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्याचं सुत्रांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचा फडणवीस, शाह यांना फोन

एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाणाऱ्या आमदारांना रोखण्यात यश येत नसल्याचं आणि पक्षात फूट पडणार हे याची जाणीव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. सुत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना कॉल केला आणि 'एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यापेक्षा भाजपने थेट माझ्याशी (उद्धव ठाकरे) चर्चा करावी,' असा प्रस्ताव ठाकरेंनी ठेवला. मात्र, याला फार विलंब झाल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.

uddhav thackeray calls to devendra fadnavis
'...याच भयातून शिवसेना फोडली अन् उद्धव ठाकरेंचे पाय खेचले'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना काय दिला सल्ला?

गेल्या वर्षभरानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेलं हे पहिलं संभाषण होतं. या उद्धव ठाकरे यांना नकार देतानाच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरे यांच्याकडून नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सुत्रांच्या माहितीप्रमाणे २०१९ मध्ये भाजपच्या पक्ष नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी चर्चेची दारंच बंद करून टाकली होती. त्यामुळेच भाजप नेतृत्वाने आता उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यास नकार दिला. शिवसेना हवी, पण ती उद्धव ठाकरेंशिवाय अशी भूमिका भाजपनं घेतली.

खासदारांना मध्यस्थी करण्याची विनंती, त्या बैठकीत काय घडलं?

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबद्दल शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिली होती. त्या खासदारांनाच मध्यस्थी करण्याची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली होती.

uddhav thackeray calls to devendra fadnavis
Maharashtra Cabinet : २० जुलैला मंत्रिमंडळ विस्तार?, १२ जण घेणार मंत्रीपदाची शपथ?

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना तीन पर्याय दिले. खासदारांनी भाजपसोबत जाण्याचा पहिल्या पर्याय निवडला. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. मी (उद्धव ठाकरे) भाजपच्या नेत्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले होते. भाजप-शिवसेना एकत्र आणण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांकडूनही प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांनाही भाजपच्या नेतृत्वाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

uddhav thackeray calls to devendra fadnavis
'एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल, तर...'; उदय सामंत यांचं पुण्यात विधान

एकनाथ शिंदेशीही चर्चा, पण...

सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क करण्याचे प्रयत्न झाले. रश्मी ठाकरे यांचा निरोप एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचाही दावा करण्यात आलाय. मात्र भाजपच्या नेतृत्वाकडून कोणताही याला होकार मिळत नसल्यानं आता एकनाथ शिंदेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in