‘अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र, पण…’, ठाकरेंचा ‘सामना’तून सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena UBT, Uddhav Thackeray, Amruta Fadnavis, Devendra fadnavis : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून सामनातून सवाल उपस्थित करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकारही समोर आला. त्यावरून सामनातून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “शिवसेनेसह विरोधी पक्षांतील अनेक आमदारांना अॅण्टी करप्शन म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नोटिसा पाठवून चौकशांचा ससेमिरा मागे लावणे हे राजकीय सूडाचे लक्षण आहे. कोकणातले आमदार राजन साळवी व त्यांच्या कुटुंबीयांचा सरकारने असाच छळ चालवला आहे. आमदार वैभव नाईक, नितीन देशमुख यांनाही ‘अॅण्टी करप्शन’च्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. हे सर्व लोक मिंधे गटात सामील झाले नाहीत. त्यांनी आपले इमान विकले नाही. त्याची शिक्षा त्यांना दिली जात आहे. आता यावर फडणवीस हे नाकाने कांदे सोलत सांगतील की, ‘कर नाही त्याला डर कशाला?”

कुल यांना नोटीस पाठवली आहे काय?, ठाकरे गटाचा सवाल

“फडणवीस तुमचे बरोबर आहे, पण ‘डर’ आम्हाला नसून तुमच्या लोकांना आहे व तुमच्याच संरक्षणाखाली भ्रष्टाचाराचे कुरण फुलले आहे. दौंडच्या भीमा पाटस साखर कारखान्याचा 500 कोटींचा घोटाळा समोर आला. शेतकऱ्यांचा पैसा भाजप आमदार कुल यांनी ‘हडप’ केला. त्या पैशांचा अपहार झाल्याचे उघड होऊनही फडणवीस हे आमदार कुल यांची वकिली करताना दिसतात. तुमच्या त्या ‘अॅण्टी करप्शन ब्युरो’, ‘इकॉनॉमिक ऑफेन्स विंग’ या भ्रष्टाचार संरक्षण मंडळाने श्रीमान कुल यांना नोटीस पाठवली आहे काय?”, असा सवाल ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक

शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरण : “मुका प्रकरणातले सत्य का शोधले नाही?”

शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून बरंच राजकारण तापलं. या मुद्द्यावरही सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरून ठाकरे गटाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

ADVERTISEMENT

“मुंबईतील ‘मुका’ प्रकरणातील मुख्य आरोपी राहिले बाजूला, उलट राजकीय विरोधकांवरच कारवाई केली जात आहे. पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांनासुद्धा कायद्याने शिक्षा व्हायला नको काय? कोणत्याही अश्लील कृतींमुळे समाजाला त्रास होत असेल तर तो भारतीय दंडसंहितेच्या कलम 294 अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. मुंबई पोलीस अॅक्ट कलम 110 नुसारदेखील हा गुन्हा आहे. मग राज्याच्या गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून ‘मुका’ प्रकरणातले सत्य का शोधले नाही?”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

प्रियंका चर्तुर्वेदी-अमृता फडवणीसांमध्ये घमासान; ‘मॅडम चतूर… औकात… अन्’

ADVERTISEMENT

“फडणवीसांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही”

“ठाण्यातील एक पालिका अधिकारी आमदार आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने धमक्या देतो. त्यांना ठार मारण्याची सुपारी थेट अमेरिकेत देतो व तुमचे गृहमंत्रालय नाकाने कांदे सोलत बसलेय. श्री. फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत”, असं म्हणत ठाकरे गटाने फडणवीसांना डिवचलं आहे.

सट्टेबाजांशी डीलचा प्लान, 1 कोटींची ऑफर, अमृता फडणवीसांनी सांगितलं सगळं प्रकरण

अमृता फडणवीसांना 1 कोटींची ऑफर, सामनात काय म्हटलंय?

अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी सौ. अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रश्न इतकाच आहे की, या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी?”, असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT