Ramdas Kadam : "शिंदे साहेब, मोदी-शाहांना सांगा", कदमांनी भाजपवरच फोडले खापर

मुंबई तक

Ramdas kadam speech : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातच रामदास कदमांनी घटलेल्या जागांचे खापर भाजपवर फोडले. इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला शंभर जागा देण्याची मागणीही त्यांनी केली.

ADVERTISEMENT

google news

Ramdas kadam speech Video : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी भाजपने टाकलेल्या दबावाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला भाजपने उमेदवार बदलायला लावले, या गोष्टीवरही कदमांनी शिक्कामोर्तब केले. इतकंच नाही, तर आता मोदी शाहांना सांगा. मला घेऊन चला मी सांगतो असे म्हणत शिवसेनेच्या घटलेल्या जागांचं खापर भाजपवर फोडले. (Ramdas Kadam Full Speech)

विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका असे सांगत असतानाच रामदास कदमांनी हात जोडले. 

ते म्हणाले, "एक हात जोडून विनंती शिंदे साहेबांना आहे. आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा. हात जोडून विनंती आहे. मला माहितीये या विषयावर कोणी बोलणार नाहीये. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शाह साहेबांकडे... मी सांगेन की, साहेब जसे भाजपचे दोन महिने आधी उमेदवार दिले. तसे शिंदे साहेबांचे १५ उमेदवार दोन महिन्यांआधी दिले असते, तर आज चित्र वेगळे दिसले असते."

हेही वाचा >> शिंदेंना संपवू शकणार नाही, मुख्यमंत्र्यांचा नेमका रोख कुणावर?

"माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती. माझा हेमंत दिल्लीत गेला असता. नाशिकचा आमचा गोडसे दिल्लीत गेला असता. पण, एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली. आमची जागा... आमची जागा... अरे भानगड काय?"