Eknath Shinde : शिंदेंना संपवू शकणार नाही, मुख्यमंत्र्यांचा नेमका रोख कुणावर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde criticize udhhav thackeray worli dome shiv sena vardhapan din lok sabha result maharashtra shiv sena ubt
शिवसेनेचा पारंपारिक मतदार आपल्यासोबत म्हणजेच धनुष्यबाणासोबत आहे.
social share
google news

Eknath Shinde, Shiv Sena Vardhapan Din :  एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते. पण या राज्यातील मतदारांनी त्यांचे दात त्यांच्या घशात घातले आहेत,अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे. एकनाथ शिंदे संपला नाही, हा एकनाथ शिंदे जिंकला. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या साथीने हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जिंकल्याचे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.  (eknath shinde criticize udhhav thackeray worli dome shiv sena vardhapan din lok sabha result maharashtra shiv sena ubt) 
 
वरळीच्या डोममध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 58 वा वर्धापण दिन सोहळा पार पडला. या सोहळ्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. कुणी म्हटलं ठाणे पडेल, कल्याण पडेल... पण लोकसभेत आम्ही घासून, पुसून नाही तर ठासून विजय मिळवला. शिवसेनेचा पारंपारिक मतदार आपल्यासोबत म्हणजेच धनुष्यबाणासोबत आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. आपण घेतलेला निर्णय किती योग्य होता हे या निवडणुकीतून जनतने दाखवून दिले, असे एकनाथ शिंदे म्हणालेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sanjay Raut : राऊतांचा PM मोदींना टोला, ''मोदी हा ब्रँड होता, आता...''

शिवसेनेच्या 19 टक्के मतदारांपैकी साडे 14 टक्के मतदार हे आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या पक्षाकडे आले. आणि साडे 4 टक्के मतं तिकडे राहिली. ही तात्पुरती आलेली सूज आहे. ही सूज उतरते पण एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते. पण या राज्यातील मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. हा एकनाथ शिंदे संपला नाही हा एकनाथ शिंदे जिंकला. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

वारसा सांगणाऱ्यांना हिंदुत्व म्हणून घेण्याची लाज वाटतेय. त्यांना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी झाली आहे. बाळासाहेबांचा नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही, अशी टीका देखीस शिंदे यांनी ठाकरेंवर केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'बिनशर्ट पाठिंबा...', उद्धव ठाकरे उडवली राज ठाकरेंची खिल्ली!

या देशातील जनतेने उद्धव ठाकरेंना सत्तेपासून दूर केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या पाच वर्षात विकासाला बुलेटच इंजिन लागल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT