Sanjay Raut : राऊतांचा PM मोदींना टोला, ''मोदी हा ब्रँड होता, आता...''

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay raut slam pm narendra modi on shiv sena vardhapan sohla udhhav thackeray shiv sena
त्या डोममध्ये डोमकावळे जमलेत, डोमकावळ्यांचं संमेलन सुरु आहे.
social share
google news

Sanjay Raut Criticize Narendra Modi : ष्णमुखानंदमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापण दिन सोहळा सुरु आहे. या सोहळ्यात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  मोदी 400 पार घेऊन येणारच तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण जन्माला येतानाचा ते 400 खुळखुळे घेऊन आले होते. त्या भाजपचा आणि मोदींचा साफ खुळखुळा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात केलाय, अशी बोचकी टीका संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. (sanjay raut slam pm narendra modi on shiv sena vardhapan sohla udhhav thackeray shiv sena) 

त्या डोममध्ये डोमकावळे जमलेत, डोमकावळ्यांचं संमेलन सुरु आहे. आमचा 58 वा वाढदिवस आहे आणि ते अडीच वर्ष आहे.  पण त्यांना पुढे तोही होतो की नाही हे माहिती नाही. गुजरातचे सोमे गोमे येऊन शिवसेनेवर वार करू लागलेत, त्यांना ते जमणार नाही. शिवसेनेचा खरा वारसा हा उद्धव ठाकरे यांनी चालवला, असा हल्ला देखील राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यावर चढवला. मोदी हा ब्रॅँड होता आता ते ब्रँडी आहेत, हा काही ब्रँड राहायला नाही, आता ते ब्रँडी झाले आहेत,असा टोला देखील राऊतांनी मोदींना लगावला 

हे ही वाचा : 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं येईल सरकार', भाजपचं टेन्शन वाढलं!

अयोध्येत प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. रामाचा फोटो एवढा...मला प्रश्न प्राणप्रतिष्ठा रामाची आहे की मोदींची आहे.चार तास टीव्ही पाहिला, मला प्रभू रामाची मुर्तीच दिसली नाही, फक्त मोदीच दिसतायत. आता मोदींना राम दिसला असेल,  रामाने त्यांना लाथ घेतल्यावर अशी बोचरी टीका देखील संजय राऊत यांनी मोदींवर केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : MLC Election 2024 : आमदार फुटण्याचा धोका! महायुती-मविआ किती जागा जिंकणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT