Pankaja Munde : अमित शाहांच्या स्वागतासाठी पंकजा मुंडे थेट विमानतळावर, अर्थ काय?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Pankaja Munde Latest news : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पंकजा मुंडे थेट विमानतळावर पोहोचल्या.

social share
google news

Pankaja Munde Latest news : धनंजय मुंडे भाजपसोबत सत्तेत आले तेव्हापासूनच पंकजा मुंडेंचं काय होणार? ही चर्चा सुरू झाली. कारण, धनंजय मुंडे परळी विधानसभेचे सध्याचे आमदार आहेत आणि भविष्यातही त्यांचा मतदारसंघांवर हक्क पहिला आहे. माझ्या मतदारसंघाचा प्रश्न निर्माण झालाय, असं स्वतः पंकजा मुंडे बोलून दाखवतात. पंकजा मुंडेंना राज्यसभा मिळेल या चर्चाही होत्या. पण, काँग्रेसमधून आलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवलं आणि पंकजांबद्दल चर्चा त्या चर्चाच राहिल्या. पंकजा मुंडेंना लोकसभेत पाठवलं जाणार अशीही चर्चा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे खासदार आहेत. बहिणीला घरी बसवून मी लढणार नाही, अशी भूमिका पंकजांनी आधीच जाहीर केली आहे. आता पंकजांना दुसरा मतदारसंघ द्यायचा तर तो बीडजवळचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ...पण, इथंही पंकजांचे निकटवर्तीय भागवत कराड यांना भाजपनं आधीच तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

भागवत कराडांना ताकद 

आधी भागवत कराड यांना राज्यसभा दिली. त्यानंतर मंत्रिपद देऊन त्यांचे हात बळकट केले. आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला तगडा उमेदवार हवा आहे. कारण, ही जागा महायुतीत शिवसेनेकडे आहे. त्यामुळे ही जागा मिळवण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. त्यासाठीच भागवत कराड यांना संभाजीनगरमधून लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> 'आम्ही शिवसेना भाजपमध्ये विलीन केलीये का?', कदम भाजपविरोधात आक्रमक

भागवत कराड यांनीही या मतदारसंघात तयारी सुरू केलेली दिसते. संभाजीनगरात हिंदूत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका होतात हे आपल्याला माहिती आहे. हाच मुद्दा हेरत भागवत कराड यांनी बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमातून शक्तीप्रदर्शन केलेलं आपण पाहिलं... अमित शाहांची देखील संभाजीनगरमध्ये सभा आहे. खरंतर हा दौरा दोन आठवड्यांपूर्वी होणार होता. त्यावेळी अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा होता. पण, तो दौरा रद्द झाला आणि आता शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत. त्यांचं ज्यावेळी संभाजीनगरमध्ये आगमन झालं त्यावेळी भागवत कराडांसह पंकजा मुंडे त्यांच्या स्वागतासाठी दिसले. त्याचाच हा फोटो समोर आला.

बऱ्याच काळानंतर पंकजा दिसल्या स्वागतासाठी

यात भागवत कराड अमित शाह यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक भेट देताना दिसतात. पंकजा देखील हातात फूल घेऊन उभ्या आहेत. पण, या फोटोत फोकसवर दिसतात ते भागवत कराड जे पंकजांचे निकटवर्तीय आहेत. आता भाजप त्यांना लोकसभेवर पाठवणार असल्याचीही चर्चा आहे. असं असलं तरी पंकजा मुंडे अनेक दिवसांनंतर असं एखाद्या नेत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर दिसल्या.

हेही वाचा >> निलेश लंकेंना खुली ऑफर; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवणार? 

कदाचित त्या अमित शाह यांना त्यांचा नेता मानतात म्हणून स्वतः विमानतळावर स्वागतासाठी गेल्या असाव्यात, असं म्हटलं तर याआधीही अमित शाह अनेकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेलेत. त्यात पंकजा दिसल्या नाहीत. पण, आता त्या स्वतः विमानतळावर शाहांच्या स्वागताला गेल्या...गेल्या काही दिवसांपासून अॅक्टीव्ह न दिसणाऱ्या पंकजा मुंडे अचानक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिक सक्रीय झालेल्या दिसतात...पण, आता भाजप त्यांना लोकसभेवर पाठवणार का? त्यांचं पुनर्वसन करणार का हे बघणं महत्वाचं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT