एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांचा तोल सुटला, म्हणाले…
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान टीका केली जात असल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते शिंदे गटाला लक्ष्य करत आहेत. तर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं जातंय. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना आता शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी वादग्रस्त विधान केलंय. दहिसरमध्ये झालेल्या कार्यक्रमात विनायक राऊत शनिवारी बोलत […]
ADVERTISEMENT

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान टीका केली जात असल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते शिंदे गटाला लक्ष्य करत आहेत. तर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं जातंय. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना आता शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी वादग्रस्त विधान केलंय.
दहिसरमध्ये झालेल्या कार्यक्रमात विनायक राऊत शनिवारी बोलत होते. याच कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर टीका केली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला.
विनायक राऊतांनी काय केलं वादग्रस्त विधान?
विनायक राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं. शिवसेना संपवायची. शिवसेना नाव पुसून टाकायचं. भ#### करणाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा शिवसेना संपवण्याचा धंदा आहे ना, तो उधळून टाकून ही शिवसेना केवळ बाळासाहेबांची आहे. उद्धव ठाकरेंची आहे. तुमच्या बापजाद्यांची कधी होऊच शकत नाही. हे दाखवून देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल.’
Ramdas Kadam : ‘अरे आदित्य खरा गद्दार तू आहेस, काका म्हणून पाठीत खंजीर खुपसला’