विहिरीतून धूर का येतोय? डोकावून पाहिल्यावर हादरुनच गेला..'तो' मृतदेह कोणाचा?
एका 18 वर्षीय ITI विद्यार्थ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. धक्कादायक म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विहिरीतून धूर का येतोय?
डोकावून पाहिल्यावर हादरुनच गेला..
'तो' मृतदेह कोणाचा?
Crime News : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील लक्ष्मीपुरा गावात एका 18 वर्षीय ITI विद्यार्थ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. धक्कादायक म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले आहेत. या हत्येमागील गूढ उकलण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम्स प्रयत्न करत आहेत.
कुटुंबाला धक्का
गोविंद असं मृत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याचे वडील सुखबीर सिंह हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. नातेवाईकांनी सांगितले की, गोविंद नेहमीप्रमाणे रात्री 11 वाजता घराजवळील गोठ्यात अभ्यास करण्यासाठी आणि झोपण्यासाठी गेला होता. मंगळवारी (5 मे) पहाटे पाच वाजता पाहिले असता तो अंथरुणात नव्हता. त्याच्या अशा अचानक गायब होण्याने कुटुंबाला धक्काच बसला. यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली.
हे ही वाचा : डोंबिवली हादरलं! मित्राचा रुग्णालयात मृत्यू, आई-वडील बाहेरगावी असताना तरुणानं गळफास घेत संपवलं जीवन
विहिरीत डोकावले असता..
त्याचा शोध सुरु असतानाच काही तासांतच सर्वांना धक्का बसला. सकाळी साडे नऊ वाजता एका वाटसरुला गावच्या बाजूला असलेल्या एका विहिरीतून धूर येत असताना दिसला. त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता, तो हादरुनच गेला. त्याला त्या विहिरीत एक मृतदेह दिसून आला. याची सूचना पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह गोविंदचाच असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : बायकोने हात धरले, प्रियकराने घोटला गळा अन् नंतर...निवृत्त लष्करी जवानाला कसे संपवले?
एसपींनी दिली 'ही' माहिती
या घटनेची माहिती मिळताच एसपी नरेंद्र प्रताप स्वत: अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी सांगितले की, गोविंदचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एसपींनी आश्वासन दिले आहे की, पोलिसांची टीम बारकाईने तपास करत आहेत. पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या आधारावर हत्येचा तपास केला जाईल आणि लवकरात लवकर आरोपीला तुरुंगात पाठवलं जाईल. दरम्यान, पोलीस नातेवाईक आणि संशयित लोकांची चौकशी करत आहेत.









