Maratha Reservation: मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं अन् CM शिंदे म्हणाले, ‘आम्ही कोणाचीही…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

we will not cheat anyon said cm eknath shinde held a press conference as manoj jarange called off his fast maratha reservation
we will not cheat anyon said cm eknath shinde held a press conference as manoj jarange called off his fast maratha reservation
social share
google news

CM Eknath Shinde on Manoj Jarange: मुंबई: मराठा आरक्षणसाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज (2 नोव्हेंबर) आपलं आंदोलन मागे घेतलं. यावेळी 2 जानेवारीपर्यंतचा वेळ हा सरकारला देण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सरकारची नेमकी भूमिका असेल ते स्पष्ट केलं. (we will not cheat anyon said cm eknath shinde held a press conference as manoj jarange called off his fast maratha reservation)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की, ‘सरकार म्हणून मराठा समाजाची किंवा इतरही समाजाची कुणाचीही फसवणूक, वेळकाढूपणा.. फसवणूक करु शकत नाही.. करणार नाही. सरकार वेळकाढूपणा करणार नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी सरकार हे मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा>> Maratha Reservation: ‘या’ घडीची मोठी बातमी… मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, घेतला मोठा निर्णय

जरांगेंनी उपषोण सोडताच मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषद, नेमकं काय म्हणाले?

‘मनोज जरांगे पाटील यांना हे देखील सांगितलं की, आपण जो निर्णय घेऊ तो टिकणारा असला पाहिजे. तो कुठेही चँलेज होता कामा नये. सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि माझे सहकारी यांच्याबाबत कुठलंही किंतु-परंतु निर्माण होता कामा नये.’

‘काल आमचे सहकारी बच्चू कडू तिथे गेले होते. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी ठरवलं की, चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. म्हणून सरकारने देखील ठरवलं आणि कायदेतज्ज्ञ तिथे गेले. मला वाटतं की, इतिहासातील पहिली घटना असेल की, कायदेतज्ज्ञ एका उपोषण स्थळी आंदोलकांशी बोलण्यासाठी जातात.’

‘कारण गायकवाड साहेबांनी पहिलं आरक्षण हे त्यांच्याच अहवालावर दिलं होतं. कारण गायकवाड साहेबांना त्याची नेमकी माहिती होती. त्यामुळे शिंदे समितीने जे काम केलं त्याबाबत मनोज जरांगे यांना देखील खात्री पटली.’

‘राज्यात ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिली जातील. शेवटी सरकार म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ शकत नाही. कारण त्याला कायदेशीर आव्हान निर्माण होईल. त्या कायेदशीर पातळीवर टिकणार नाही.’

‘सरकार म्हणून मराठा समाजाची किंवा इतरही समाजाची कुणाचीही फसवणूक, वेळकाढूपणा.. फसवणूक करु शकत नाही.. करणार नाही. सरकार वेळकाढूपणा करणार नाही.’

‘आज जी दोन महिन्यांची मुदत दिली आहे त्यात जास्तीत जास्त काम करून मराठा समाजाला न्याय कसा देता येईल त्याच बरोबर न्याय कसा देता येईल ते पाहू. इतर समाजावर अन्याय न करता ते काम करता आपल्याला करायचं आहे.’

‘सर्वपक्षीय बैठक जी आम्ही घेतली. त्यात आम्ही जी भूमिका घेतली त्यात असं ठरलं की, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. आमची ही भूमिका सर्वपक्षीयांना देखील पटली आहे.’

‘मराठे समाजाचे तरुण.. सरकार प्रामाणिकपणे काम करत असताना.. सरकार नकारात्मक असतं तर हे पाऊल उचलणं ठीक होतं. आज पुन्हा मराठा समाजाच्या तरुणांना आवाहन करतो की, आपण टोकाचं पाऊल उचलू नका आत्महत्येसारखं. आपलं जे कुटुंब आहे त्याला वाऱ्यावर सोडू नका. मराठा समाजाने संयम राखणं आवश्यक आहे.’

‘काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पण मनोज जरांगेंचं म्हणणं आहे की, ज्यांनी जाणूनबुजून जाळपोळ, तोडफोड केली असेल तर ते मराठे समाजातील आंदोलक होऊच शकत नाही. त्याच्यावर नक्कीच पोलीस आणि गृह विभाग काम करतंय.’ असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> Manoj Jarange : अन्न-पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? मृत्यू होऊ शकतो का?

अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली असली तरीही मराठा समाजाला पुढील दोन महिन्यात कशाप्रकारे आरक्षण मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT