RPI मोदी सरकारसोबत असताना राज ठाकरे यांची गरजच काय?: आठवले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘राज ठाकरे यांना NDA मध्ये घेण्याची गरज नाही. रिपाई (RPI) मोदी सरकारबरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय?’ असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

‘राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे. हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही.’ असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे.

पाहा रामदास आठवले यांनी आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवर केली टीका:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रामदास आठवले हे आज (5 मे) सोलापूर दौर्‍यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. मध्येच राज ठाकरे यांनी मशिदीवरील स्पीकर काढावेत त्यांच्या समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका घेतली आहे. हा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे.’

‘धर्माचा बुरखा घालून कोणी संविधानाविरोधात काम करत असेल तर आमचा त्यांना विरोध असेल. पोलीस बळजबरीने राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून मशिदीवरील स्पीकर काढायला लावत आहेत. पोलिसांनी अशी भूमिका घेऊ नये. कायद्याचं पालन करावं.’

ADVERTISEMENT

‘धार्मिक स्थळावरील स्पीकर उतरवताना समान भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे. राज ठाकरे यांना एनडीएमध्ये घेण्याची गरज नाही. रिपाई मोदी सरकारबरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय?’ असा सवालही यावेळी आठवले यांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

‘ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार अपयशी ठरलं’

‘ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा समाजाला मिळणार आरक्षण असो. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यास अपयशी ठरलं आहे. आता या सरकारची जबाबदारी आहे, उभयतांना आरक्षण मिळवून द्यावं. भूमीहिनांना देशात प्रत्येकी पाच एकर जमीन कसण्यासाठी द्यावी.’

’20 कोटी एकर अतिरिक्त जमीन शिल्लक आहे असं सांगून आठवले म्हणाले दोन हजार पर्यंतच्या गायरान वरील अतिक्रमणाच्या जागा संबंधितांच्या नावे कराव्यात. तसेच 2019 पर्यंतच्या झोपड्या अधिकृत कराव्यात अशी आमची मागणी आहे.’

‘राज्याने पेट्रोलवरील कर कमी न केल्याम महागाई वाढली’

‘पेट्रोलजन्य पदार्थ वरील कर केंद्राने कमी केले पण राज्य सरकारने ते कमी केले नाहीत आणि म्हणूनच महागाईचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. राज्य सरकार आपल्या भूमिका नीट पार पाडत नाही आणि केंद्राकडे सातत्याने बोट ही दाखवतं ही त्यांची भूमिका आयोग्य आहे.’

‘राज्यातील सरकार पडावं अशी इच्छा आहे, पण…’

‘काहीही झालं तरी आगामी निवडणुकीत केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार येणार. यात भाजपला 350 जागा मिळतील तर आघाडीला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यातील सरकार पडावं अशी इच्छा आहे. पण पडत नाही. पण पडेल. तेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही येथे चांगलं सरकार बनवू.’ असा दावाही त्यांनी केला.

आगामी महापालिका निवडणुकात भारतीय जनता पार्टीबरोबर मुंबई आणि अन्य महापालिकांमध्येही आमची युती राहील आणि सर्वत्र आमची सत्ता येईल. असा दावाही आठवले यांनी केला आहे.

‘ठाकरे सरकार पडणार, राष्ट्रपती राजवट लागणार या फक्त बातम्या आहेत’, असं का म्हणाले रामदास आठवले?

‘संभाजी भिडेंवर कारवाई झालीच पाहिजे’

‘संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली पण त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोलणार आहोत.’ असेही आठवले म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT