PM Modi म्हणाल्याप्रमाणे वीर सावरकर तुरूंगात असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायचे का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. यावेळी मोदींनी भाषणही केलं, पण भाषणातील एका मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले गेले. संत तुकाराम महाराजांबद्दल गौरवोद्गगार काढतानाच वीर सावरकर तुरूंगात असताना तुकोबारायांच्या अभंग म्हणायचं असं पंतप्रधानांनी म्हटलं. पंतप्रधानांच्या विधानांवरून चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

”संत हे आपल्यात असलेल्या उर्जेचा स्रोत असतात. ते विविध परिस्थितींमध्ये समाजाला गती देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांचं मोठं स्थान आहे. एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी हातातल्या बेड्या ते चिपळ्यांप्रमाणे वाजवत आणि तुकारामांचे अभंग गात असत”

Narendra Modi: “वीर सावरकर तुरुंगात बेड्या चिपळ्यांप्रमाणे वाजवत,तुकोबांचे अभंग म्हणत”

ADVERTISEMENT

माझी जन्मठेप या पुस्तकात काय उल्लेख आहे?

ADVERTISEMENT

सावरकर यांनी लिहिलेलं माझी जन्मठेप या पुस्तकात तुकाराम महाराजांचा उल्लेख नाही. या पुस्तकात सावरकर यांनी रामदास स्वामींचा तसंच दासबोधाचा उल्लेख केला आहे. धर्मासाठी मरावे!मरोनी अवघ्यांसी मारावे!! मारिता मारिता घ्यावे! राज्य आपुले!! रामदास स्वामी यांची ही उक्ती सावरकरांनी वापरली आहे. मात्र तुकाराम महाराजांचे अभंग म्हटल्याचा उल्लेख माझी जन्मठेप या पुस्तकात नाही.

‘मला वाटत नाही की महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत’ वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचं वक्तव्य

सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी काय म्हटलं आहे?

मुंबईतकशी फोनवर केलेल्या दाव्यात रणजीत सावरकर म्हणाले की, ”वीर सावरकर यांच्या विचारांवर तुकाराम महाराजांचा खूप प्रभाव होता. हिंदुत्व नावाचा ग्रंथ जो सावरकरांनी लिहिला आहे त्याचा शेवट त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाने केला आहे. बंदिवासात असताना ते गाणी म्हणत असत, स्वतःशी गाणी, अभंग सावरकर म्हणत असत. अनेक संतांचे अभंगही ते म्हणत असत. हिंदुत्वाच्या विचारांनी ते प्रेरित झालेले होते. त्यावेळी तुरुंगात असताना ते अभंग गात होते.”

सावरकर यांच्याविषयी अभ्यास असलेले अभिनेते शरद पोंक्षे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो दावा केला आहे ते वाचनात आलेले नाही. संतांचा, छत्रपती शिवराय यांच्या विचारांचा, शिकवणुकीचा प्रभाव सावरकर यांच्या विचारांवर होता. मात्र ते हातातल्या बेड्या चिपळ्यांप्रमाणे वाजवत तसंच तुकोबारायांचे अभंग म्हणत हे काही मी वाचलेलं नाही. जे वाचलेलं नाही किंवा माहित नाही त्याबद्दल बोलणं योग्य नाही”

सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूरमध्ये झाला. राष्ट्रभक्त ही गुप्त संघटना सावरकरांनी सुरू केली होती. या संघटनेचं त्यानंतर अभिनव भारत संघटनेत रूपांतर झालं आहे. १९०५ मध्ये सावरकरांनी स्वदेशी कापडाची होळी केली होती. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवणं स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT