बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष कोण आहे? फॅमिली ट्रस्टचा आरोप का होतोय?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या स्मारकाचा वाद तापला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यावरुन या स्मारकाची मालकी आता बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाकडून राज्य सरकारकडे जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे स्मारक कुठल्याही वैयक्तिक खानदानाचं किंवा व्यक्तीचं नाही. […]
ADVERTISEMENT

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या स्मारकाचा वाद तापला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यावरुन या स्मारकाची मालकी आता बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाकडून राज्य सरकारकडे जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे स्मारक कुठल्याही वैयक्तिक खानदानाचं किंवा व्यक्तीचं नाही. ते राज्य सरकारचं स्मारक आहे. ती जमीन राज्य सरकारची आहे. त्याच्यावरचा निधी राज्य सरकार लावते, असं लाड यांनी म्हटलं आहे.
तर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं अशी पक्षाची कुठलीही मागणी नाही. वैयक्तिकदृष्ट्या कोणालाही काही वाटतं असेल तर ते वाटणं शक्य आहे. भाजपची अशी कोणतीही मागणी नाही. बाळासाहेबांचं स्मारक हे जनतेचं आहे आणि जनतेचं राहणार आहे. त्याच्या व्यवस्थापन कमिटीमध्ये कोण आहे, कोण नाही, यात आम्हाला घेण-देणं नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पण या सगळ्यात हा वाद का तापला आणि या स्मारक समितीवर फॅमिली ट्रस्टचा आरोप का होत आहे? हे बघणं गरजेचं आहे. यासाठी स्मारकाचा ताबा आता कोणाकडे आहे? ज्यांच्याकडे आहे ते मालक कोण? फडणवीस सरकार, ठाकरे सरकारमध्ये या स्मारकाविषयी काय निर्णय घेण्यात आले आहेत, समजून घेऊ.
१७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस सरकार आल्यावर स्मारक उभारणीसाठी समिती गठीत करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. या समितीत तेव्हा कोणताही राजकीय नेता, लोकप्रतिनिधी नव्हता. २०१४ मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीत तयार करण्यात आली.