बृजभूषण राज ठाकरेंना कालनेमी राक्षस म्हणाले, पण हा राक्षस कोण होता?

कालनेमी हा रामायणात उल्लेख असलेला मायावी राक्षस होता
बृजभूषण राज ठाकरेंना कालनेमी राक्षस म्हणाले, पण हा राक्षस कोण होता?
Why did Brijbhushan mention Raj Thackeray as Demon Kalnemi?फोटो इंडिया टुडे

राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा घोषित केला.. आणि त्यावरून महाभारत घडायला लागलं.. भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना याच दौऱ्यावरून इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर राज ठाकरेविरोधात उभं ठाकताना त्यांनी त्यांचा उल्लेख कालनेमी असा केला.. त्यानंतर चर्चा व्हायला लागली की बृजभूषण शरण सिंग यांनी राज कालनेमी असा उल्लेख का केला? कालनेमी कोण होता? तेच आपण आता जाणून घेऊ

Why did Brijbhushan mention Raj Thackeray as Demon Kalnemi?
बृजभूषण शरण सिंह का म्हणाले, राज ठाकरे रावणापेक्षाही पापी

कालनेमीचा उल्लेख रामायणात

रामायणातल्या कथेसुनार, प्रभू रामचंद्रांचं रावणाबरोबर युद्ध सुरू होतं तेव्हा तेव्हा रावणाने राम-लक्ष्मण यांना हरवण्यासाठी आपला मुलगा इंद्रजित याला पाठवलं. इंद्रजितचं नाव मेघनाथ असंही होतं. त्याने इंद्रालाही हरवलं होतं म्हणून त्याला इंद्रजित म्हणत. मेघनाथाने लक्ष्मणावर अस्त्र चालवलं. त्यामुळे लक्ष्मणाला मुर्छा आली. यानंतर वैद्यराज सुषेण यांच्या सांगण्यावरून प्रभू हनुमान संजीवनी बुटी घ्यायला हिमालयाच्या दिशेने जाऊ लागले. हनुमानाला ही संजीवनी बुटी मिळू नये म्हणून रावणाने मायावी राक्षस कालनेमीला पाठवलं, हिमालयावर पोहोचण्यापूर्वी हनुमानाचा वध करायचा असं कालनेमीला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कालनेमी राक्षसाने एका साधूचा वेश धारण केला आणि रामनामाचा जप करायला सुरूवात केली. प्रभू हनुमान रामनाम ऐकून तिथेच थांबले.

Brij Bhushan Sharan Singh Compares Raj Thackeray with Ravana
Brij Bhushan Sharan Singh Compares Raj Thackeray with Ravana

कालनेमीने त्यांच्या रामभक्तीचे दाखले दिले आणि प्रभू हनुमानाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कालनेमीने आपल्या आश्रमात येऊन काही काळ आराम करा अशी विनंती प्रभू हनुमानाकडे केली. थकलेले असल्याने अंघोळ करण्याची इच्छा व्यक्त केली. हनुमान अंघोळीला गेले असताना कालनेमी राक्षस तिथे मगरीचं रुप धारण करून गेला, प्रभू हनुमानावर हल्ला चढवला.. तेव्हा तिथे त्या कुंडात युद्ध झालं, कालनेमीचा वध झाला. असं म्हणतात जिथे प्रभू हनुमानाने हा वध केला ते स्थान बिजेथुआमध्ये आहे असं मानलं जातं. कालनेमीच्या वधानंतर प्रभू हनुमान यांनी संजीवनी बुटी घेतली आणि पुढची कथा सर्वश्रृत आहे.

तर या रामयाणातल्या कथेनुसार कालनेमी हा एक मायावी राक्षस होता. ज्याने रामभक्तीचा खोटा आव आणला होता. त्याचा हेतू प्रभू हनुमानाचा वध करणं होता मात्र तो त्याची काळजी असल्याचा बनाव करत होता. हनुमानाने त्याचा वध केला होता. आता हनुमान चालीसेचं राजकारण राज ठाकरे करत आहेत अशात कालनेमी असं संबोधून ते कसे बनाव रचत आहेत हेच कदाचित बृजभूषण यांना दाखवायचं असावं त्यामुळेच त्यांनी त्यांच्याबाबत हे वक्तव्य केलं आहे अशी चर्चा आहे.

Related Stories

No stories found.